अंबाबाई मंदिर घातपाताचा फोन करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

अंबाबाई मंदिर घातपाताचा फोन करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई मंदिर मध्ये घातपात होणार असल्याचा फोन करणाऱ्या संशयित व्यक्तींना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सासरा बाळासो कुरणे आणि जावाई सुरेश लोंढे अशी त्यांची नावे आहेत. अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन पणजी कंट्रोल रूमला केला होता. यानंतर पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली होती. अंबाबाई मंदिरात बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम राबवली होती. फोन करणारे संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावमधील आहेत.

पोलिसांनी जावई आणि सासरे यांना केली अटक

सासऱ्याचा फोन जावयाने वापरून अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन केला होता. दारूच्या नशेत जावयाने फोन केल्याचा दावा सासऱ्याने केला आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news