Gulabrao Patil : …तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता; गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा

Gulabrao Patil
Gulabrao Patil
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी १० आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे तब्बल ५० आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठे विधान केले आहे.

जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही, मात्र आम्ही ८ जणांनी मंत्रिपद सोडलं. आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपाकडे आलो. आम्ही मंत्रिपद तर सोडलं होतं. मात्र जर आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली होती. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी आम्हाला ३८ आमदारांची गरज होती. मी ३३ वा होतो आणखी जर ५ आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता. मात्र, असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खूणगाठच डोक्यात बांधून आम्ही बाहेर पडलो होतो, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांना लगावला टोला..

दरम्यान पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हटले की, एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर २२ आमदारांसह मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी आम्हाला "दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे" असं म्हणून डिवचलं, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना टोला लगावला.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news