नागपूर विद्यापीठातील लैंगिक छळाच्या प्रकरणासाठी 'एसआयटी' स्थापन करा : निलम गोऱ्हे यांची मागणी | पुढारी

नागपूर विद्यापीठातील लैंगिक छळाच्या प्रकरणासाठी 'एसआयटी' स्थापन करा : निलम गोऱ्हे यांची मागणी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडून तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशा आशयाची भीती दाखवून जनसंवाद विभागाचे डॉ. धर्मेश धनवकर यांनी प्राध्यापकांची फसवणूक केली. तसेच खंडणी वसूल केली. या घटनेनंतर शनिवारी (दि.१९) विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात धर्मेश धवनकर यांना निलंबित करण्याची मागणी केली.

या प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. यापूर्वीही नागपूर विद्यापीठामध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दडपले गेले आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

धर्मेश धवनकर यांनी सन २०१८ ते २०२० च्या दरम्यान विभागातील ७ प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची सांगत त्यांच्याकडून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी १५ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केली होती. अशी तक्रार सातही प्राध्यापकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणात धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच दरम्यान, या विषयी डॉ. गोर्‍हे लवकरच राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button