

पुढारी ऑनलाईन – काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले खासदार शशी थरुर यांनी त्यांच्या केरळ राज्यातील काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. केरळ काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, अशी भूमिका व्यक्त केली आहे. तसेच केरळ काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या समर्थानासाठी ठराव करण्याचीही मागणी सुरू झालेली आहे. (Tharoor fails to get support from home state for Congress prez bid)
माजी मंत्री रमेश चेन्निथला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "केरळ काँग्रेस कमिटीने कुणाच्याही नावचे समर्थन केलेले नाही. राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष व्हावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत लाखो लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. यावरून देशातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो. त्यामुळे पक्षाध्यक्ष त्यांनीच व्हावे, अशी आमची इच्छा आहे."
खासदार मुरलीधरन एम. पी. म्हणाले, "दुसऱ्या कुणी अशी यात्रा काढली असती तर १० लोकही जमले नसते. केरळमधील काँग्रेसचे सदस्य फक्त नेहरु परिवारातील उमेदवारालाच मत देतील."
खासदार कोडीक्कुनिल सुनील म्हणाले, "थरूर या निवडणुकीबद्दल गंभीर वाटत नाहीत. पात्र असलेला कुणीही निवडणूक लढवू शकतो. मला असे वाटते की नेहरू घरण्यातील व्यक्तीच या पदासाठी सर्वाधिक पात्र आहेत."
हेही वाचा