Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपद उमेदवारीसाठी शशी थरूर यांच्यासह अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत

Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपद उमेदवारीसाठी शशी थरूर यांच्यासह अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर यासाठी सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी सुद्धा हिरवा कंदिल दिला आहे. तर या निवडणुकीत शशी थरूर यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot) उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन बढ्या नावांमुळे काँग्रेसच्या अध्यपदाच्या निवडणुकीसाठी मोठी नावे उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे काँग्रेसची अध्यक्षपद निवडणूक अत्यंत रंजक व प्रतिष्ठापूर्ण बनेल अशी चिन्हे दिसत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशी थरूर (Shashi Tharoor) यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. तसेच थरुर यांच्या उमेदवारी पदासाठी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सुद्धा काही हरकत नाही. त्यांच्या उमेदवारीसाठी सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.

तत्पूर्वी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर सोनिया गांधी यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या भेटीनंतर शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान, शशी थरुर यांच्या उदेवारीची निश्चिती होत असताना आता काँग्रेसमधील आणखी एका ज्येष्ठ नेत्याचे नाव पुढे आले आहे.

सुत्रांच्या माहिती नुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे शशी थरुर यांच्या समोर काँग्रेसमधीलच एक मोठे नाव प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगली काट्याची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक गहलोत २५ ऑक्टोंबरला दिल्ली दौरा करून उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news