एलन मस्क भरणार तब्बल ८५ हजार कोटी रुपयांचा कर! अमेरिकेतील सर्वाधिक कर भरणारे नागरिक ठरणार
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी एलन मस्क यांची ओळख आहे. जगविख्यात टेस्ला कंपनीचे सीईओ असणारे एलन
मस्क हे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. लवकरच ते अमेरिकेतील सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती ठरणार आहेत. सुमारे ११ बिलियन डॉलर (८५ हजार कोटी रुपये ) कर भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर भरणारे ते अमेरिकेतील पहिले नागरिक ठरणार आहेत.
अमेरिकेतील विख्यात टाइम मॅग्झीनने मागील आठवड्यात मस्क यांना 'पर्सन ऑफ द ईअर' घोषित केले होते. त्यांचा करण्यात आलेला हा गाैरव अमेरिकेचे सिनेटर एलिजाबेथ वॉरेन यांना रुचला नाही. त्यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून मस्क यांच्यावर करचोरी केल्याचा आरोप केला. वॉरेन यांनी म्हटलं होते की, मस्क यांना 'पर्सन ऑफ द ईअर' ऐवज कर चुकविणारा व्यक्ती, असा पुरस्कार दिला पाहिजे. यानंतर साेशल मीडियावर वॉरन आणि एलम मस्क यांच्यात शाब्दिक युद्धच सुरु झाले.
यावर्षी सर्वाधिक कर भरणार : एलन मस्क
वॉरन यांच्या टीकेला उत्तर देताना मस्क यांनी ट्विटरवरच उत्तर दिले. त्यांनी म्हटलं आहे की, मी लवकरच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरणार आहे. 'तुम्ही दोन सेंकद आपले डोळे उघडा आणि पहा मी या वर्षी अमेरिकेला किती कर देतोय ते'. अमेरिकेला ११ बिलियन डॉलरहून (८५ हजार कोटी रुपये ) अधिक कर मी देणार आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाला मिळणारा हा आजवरचा सर्वाधिक कर ठरेल.
मस्क हे आजच्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकुण संपतीही २५५ बिलियन डॉलर आहे. यावर्षी त्यांना तब्बल ५५ बिलियन डॉलरचा नफा झाला आहे.
हेही वाचलं का?

