Rohini Court Blast Case : वैज्ञानिक भारत कटारियांचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

Rohini Court Blast Case : वैज्ञानिक भारत कटारियांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : रोहिणी कोर्टातील बाॅम्बहल्ल्यातील अटक आरोपी डिफेंस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) चे शास्त्रज्ञ भारत भूषण कटारिया यांनी शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. कटारियांनी बाथरूममध्ये जाऊन हॅण्डवाॅश प्यायले. सध्या त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. डाॅक्टरांच्या निगराणीखाली कटारिया यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Rohini Court Blast Case)

स्पेशल सेल पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी वैज्ञानिक हे खूप घाबरलेले होते. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी न बोलण्याची भूमिका घेतलेली आहे. स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर आणि डीसीपी राजीव रंजन यांनीही या प्रकरणावर बोलायचे टाळले.

स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार कटारिया हे बाथरुमध्ये गेले आणि हॅण्डवाॅश प्यायले. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर कटारियांनी पोटात दुखत आहे आणि उलटीदेखील येत आहे, असं सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात त्यांना भरती केले. पण, कटारियांनी काही पित असताना कुणीही पाहिलेले नाही. फक्त त्यांना जास्त भीती वाटल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना रुग्णालयात भरती केलेले आहे, असे सांगण्यात आले.

आरोपी भारत भूषण काटरिया यांनी चौकशीमध्ये खुलासा केला होता की, वकिलांमार्फत त्यांच्याविरोधात दाखलेले केसेस अशा पद्धतीचे होते की, जर वकिलांना मारण्याचा कट रचना नसता तर त्यांनी स्वतः आत्महत्या केली असती. पण, आतापर्यंतच्या चौकशीमध्ये वैज्ञानिक कटारियांनी सहकार्य केलेले नाही. सीसीटीव्ही फुटेजमधील स्वतःची ओळख नाकारत आहेत. तसेच रोहिणा कोर्टातील स्फोटाबाबत मला काहीही माहीत नाही, असंही ते सांगत आहेत. (Rohini Court Blast Case)

हे वाचलंत का? 

Back to top button