viral video : हुंडा मागितल्याने लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, नवऱ्याला चोपला!

viral video : हुंडा मागितल्याने लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, नवऱ्याला चोपला!
Published on
Updated on

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : viral video : सुमारे ३१ लाख रुपयांहून अधिक हुंडा मागितल्या प्रकरणी वधूच्या कुटुंबीयांनी (brides family) वरासह (Groom) त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद जिल्ह्यात घडले असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. या वृत्तानुसार, नवरी मुलीकडच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला सुमारे ३ लाख रुपये आणि १ लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी दिली होती. पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी लग्नावेळी नवरी मुलीकडच्या घरच्यांकडे आणखी १० लाख रुपयांची मागणी केली. पण ही मागणी पूर्ण करणे नवरी मुलीकडच्यांना शक्य झाले नाही.

वधूच्या वडिलांनी ही रक्कम दिली नाही तर लग्न मोडण्याची धमकी देण्यात आली. वधूकडील नातेवाईकांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यामु‍ळे ऐन लग्नावेळी वाद निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आणि वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत (viral video) वधू-वरांच्या नातेवाईकांत हाणामारी सुरु आहे आणि एक महिला नवऱ्या मुलाला (Groom) वाचविताना दिसत आहे. वधूच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की वर मुलाने अनेक लग्ने केली आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news