World Photography Day 2022: मोबाईलच्या साहाय्याने तुम्हीही फोटो काढता का?, 'या' आहेत खास टिप्स | पुढारी

World Photography Day 2022: मोबाईलच्या साहाय्याने तुम्हीही फोटो काढता का?, 'या' आहेत खास टिप्स

पुढारी ऑनलाईन : आजकाल स्मार्टफोन हे फोटोग्राफीसाठी सहज उपलब्ध होणारे साधन बनले आहे. जगभरातील लोक या स्मार्टफोनच्या साहाय्यानेच अनेक प्रसंग, फोटो, चित्रे कॅप्चर करत आहेत. फोटोरिअल डेटाच्या माहितीनुसार, 2021 मध्ये जगभरात 1.2 ट्रिलियन छायाचित्रे कॅप्चर करण्यात आली. 2022 मध्ये ही संख्या 1.72 ट्रिलियन आणि 2025 पर्यंत 2 ट्रिलियन पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या छायाचित्रातील 92.5% फोटो स्मार्टफोनने घेतले जातात. स्मार्टफोनच्या सह्याने आपल्यातील कला प्रदर्शित करत अनेक नवोदित सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आज आकाराला येत आहेत. आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त खास टिप्स…

तुमच्या स्मार्टफोन कॅमेरा जाणून घ्या

स्मार्टफोनच्या सह्याने फोटोग्राफी करण्याची पहिली पायरी म्हणजे स्मार्टफोन कॅमेरा जाणून घेणे. त्यातील मॅन्युअल सेटिंग्ज अभ्यासणे आणि त्याचा वापर करून बघणे. फोटो कॅप्चर करताना कॅमेरा फोकस आणि एक्सपोजर यासारख्या गोष्टीकडे लक्ष द्या. भिन्न सेटिंग्ज वापरून चित्रांवर क्लिक करा आणि फरक तपासा. आज बरेच फोन अगदी 8K व्हिडिओ शूट करण्यास सक्षम आहेत, तर 4K किंवा UHD खूपच सामान्य झाले आहे. तुमचा फोन कॅमेरा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भरपूर चित्रे क्लिक करणे. भिन्न सेटिंग्ज वापरून तुम्ही जितकी अधिक चित्रे क्लिक कराल तितके तुम्हाला भिन्न प्रकाश आणि परिस्थितींमध्ये सर्वोत्तम छायाचित्र मिळेल. कॅमेरा वापरताना स्वतःला एका सेटिंगपुरते मर्यादित ठेवू नका. विविध सेटींगचा वापर करून बघा.

नैसर्गिक प्रकाशात प्रयत्न करा

सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सहाय्याने फोटोग्राफी करताना, घराबाहेर निसर्गाच्या प्रकाशात क्लिक करा. नैसर्गिक प्रकाशात कॅप्चर केलेले फोटो हे घरामध्ये क्लिक केलेल्या फोटोपेक्षा अधिक क्लिअर आणि हाय रिझॉल्युशनचे आलेले तुम्हाला आढळतील. यामध्ये लक्षात घेणारी गोष्ट म्हणजे प्रकाश हा तुमच्या फोटोची चमक आणि एक्सपोजर परिभाषित करत नाही तर, फोटोचा टोन आणि मोडदेखील परिभाषित करतो. शक्य झाल्यास एकाद्या वस्तूचा फोटो काढताना, त्याच्यावर पुढून प्रकाश टाका, वस्तूच्या मागून जास्त प्रकाश टाकू नका.

पुरेसा स्टोरेज आवश्यक

असे व्हायला नको की, तुम्ही खूप चांगली आणि सर्वोत्तम चित्र क्लिक कराल आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये पुरेसे स्टोरेजच नसेल. त्यामुळे तुम्ही काढलेले फोटो सेव्ह करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये पुरेसे स्टोरेज नेहमी राखून ठेवा.

आवडीप्रमाणे फोटोचे अॅंगल सेट करा

टॉप, बॉटम आणि मिडीयम अशाप्रकारे प्रसंग आणि ऑब्जेक्टनुसार तुम्ही तुमच्या फोटोचे अँगलचा वापर केला पाहिजे. तसेच फोनची Vertical आणि Horizontal फ्रेम तुम्ही निवडू शकता. म्हणजेच तुमचा स्मार्टफोन उभा पकडलात तर Vertical आणि आडवा पकडलात तर तो Horizontal फ्रेम होईल. आजकाल सोशल मीडियासाठी जास्तीत जास्त Vertical फ्रेम वापरूनच केलेल्या फोटोंचा वापर केला जातो.

फोटो कॅप्चर करताना स्थिरता महत्वाची

एखादी लहान हालचालही तुमचे चित्र खराब करू शकते. म्हणून, तुमचा स्मार्टफोन फोटो काढताना स्थिर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. फोटोग्राफी करताना तुम्ही सेल्फीस्टीक किंवा ट्रायपॉड देखील वापरू शकता. यामुळे कमी वेळेमध्ये तुम्हाला क्लिअर आणि दर्जेदार फोटो कॅफचर करता येतील.

फोटो इडिटींगचा प्रयत्न करा

आजकाल ऑनलाईन बाजारात अनेक इडिटींग अॅप उपलब्ध आहेत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही विनामूल्य फोटो इडिटींग करू शकता. या अॅपच्या सहाय्याने तुम्ही काढलेल्या फोटोमध्ये त्याची depth, tone आणि mood इडिट करू शकता. आजकाल ऑनलाईन बाजारात असेही इडिटींगचे काही अॅप आहेत जे फक्त फोटोवर फक्त एकदाच टच केल्यानंतर लक्षणीय बदल करतात.

 

Back to top button