पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲप (WhatsApp) हे जरभरात सर्वाधिक वापरले जाणारे इंन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. दररोज लाखो लोक Meta च्या मालकीचे हे प्लॅटफॉर्म वापरतात. WhatsApp आपल्या युजर्ससाठी प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक अकाऊंटवर नियमितपणे बदल करत आहे. तर काही अकाऊंटवर अनेक कारणांमुळे अचानक बंदीही घातली जात आहे आणि आणखी काही व्हॉट्सॲप अकाऊंटवर बंदी घातली जाऊ शकते. कंपनीकडून तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अचानकपणे तुम्हाला कळवत किंवा न कळवताही बॅन केले जाऊ शकते.
WhatsApp च्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, ज्या व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंटवरील कृती आमच्या सेवा आणि अटींचे उल्लंघन करत आहे, असे आढळून आल्यास, आम्ही अकाउंटवर बंदी घालू शकतो. आमच्या सेवा आणि अटींनुसार, आम्ही तुम्हाला सूचना न देताही व्हॉट्सॲप प्रतिबंधित करू शकतो. तुम्ही जर व्हॉट्सॲप यूजर्स असाल तर, तुम्हाला आम्ही अशा 10 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या कृतीमुळे तुमचे व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंट कायमचे बॅन केले जाऊ शकते.
कोणत्याही अनावश्यक कारणांसाठी स्वयंचलित किंवा इतर साधनांचा वापर करून व्हॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणावर माहिती काढणे टाळले पाहिजे. व्हॉट्सॲप युजर्सकडून फोन नंबर, त्याचा प्रोफाइल फोटो आणि व्हॉट्सॲपवरील इतर माहिती मिळवणे, हे कंपनीच्या सेवा, अटींचे उल्लंघन करते.
व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) सहाय्याने व्हायरस किंवा मेलवरील असलेल्या फाईल्स शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यामुळे पाठवणाऱ्या आणि इतर युजर्सच्या डिव्हाईसलाही हानी पोहचू शकते. व्हॉट्सअॅपवरून फाईल्स पाठवल्यामुळे तुम्हाला व्हॉट्सॲपवरून प्रतिबंधित केले जाऊ शकते.
युजर्सच्या परवानगीशिवाय तुम्ही त्याला कोणाचाही फोन नंबर शेअर करू शकत नाही. अवैध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहिती विनाकारण व्हॉट्सॲप वापरकर्ते कींवा ग्रुपमध्ये शेअर करू नका, कारण असे केल्यास तुमचे अकाउंट व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवरून बॅन केले जाऊ शकते.
व्हॉट्सॲपवर बनावट अकाऊंट तयार करणे किंवा इतर कोणाचे अकाउंट कॉपी करणे, यामुळेसुद्धा तुम्हाला व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवरून प्रतिबंधित केले जाऊ शकते. जेव्हा बिझनेस व्हॉट्सॲपचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा युजर्सची फसवणूक करण्यासाठी व्हॉट्सॲपचे फेक अकाउंट तयार केले जातात.
व्हॉट्सॲपचा वापर करून एकाचवेळी Automatic आणि bulk मेसेज किंवा AutoDial करणे चुकीचे आहे. कंपनीकडून Automatic किंवा bulk मेसेज करणारी व्हॉट्सॲप अकाउंट शोधूण, त्यावर बंदी घालण्यासाठी WhatsApp Machine Learning Technology आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंट युजर्सचा रिपोर्ट वापरला जाणार आहे.
अनधिकृत पद्धतीने एखादे व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंट किंवा ग्रुप तयार करणे. व्हॉट्सॲपचे सुधारित ॲप अपडेट वापरणे, हे देखील तुमच्या अकाऊंटवर बंदी आणू शकते. अशा ऑनलाईन साधणांचा वापर टाळला पाहिजे की ज्याद्वारे सहजपणे एकापेक्षा अधिक व्हॉट्सॲप (WhatsApp) ग्रुप करण्यास मदत करतात.
व्हॉट्सॲपच्या मते, ब्रॉडकास्ट मेसेजची लिंक एखाद्या अकाउंटवर सतत शेअर केल्यास, लोक तुमच्या मेसेजची तक्रार करू शकतात. या तक्रारीच्या आधारे कंपनीला रिपोर्ट केलेल्या अनेक व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंटवर बंदी घालावी लागू शकते.
व्हॉट्सॲप मतानुसार, जर एखाद्या व्हॉट्सॲप (WhatsApp) अकाउंटवरून तुम्हाला सतत मेसेज येत आहेत. तुम्ही हे मेसेज पाठवणे थांबवायला सांगितले पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमच्या Contact list मधून हा नंबर काढून टाकावा आणि त्यांच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या फेक मेसेज सतत पाठवल्यास त्या अकाउंटविरूद्ध तक्रार केल्यास ते व्हॉट्सॲप अकाऊंट कायमचे बॅन होऊ शकते.
व्हॉट्सॲपच्या कोडसोबत सतत खेळणे किंवा त्यात सातत्याने बदल करणे तुम्हाला धोक्यात आणू शकते. कंपनीने आपल्या अटी व शर्तींमध्ये असे नमूद केले आहे की, Reverse Engineer, Yelter, Modify, Create Derivative, Decomfile करणे किंवा सेवेमधून एखाद्या अकाउंट कोड काढून टाकणे चुकीचे आहे. यामुळे व्हॉट्सॲप अकाऊंट बंद केले जाऊ शकते.
GB WhatsApp या WhatsApp Plus यांसारख्या थर्डपार्टी ॲपचा वापर केल्यास, तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली जाऊ शकतो. कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, 'व्हॉट्सॲप प्लस' हे एक ॲप आहे, जे व्हॉट्सॲप ने विकसित केलेले नाही आणि व्हॉट्सॲप चे त्यावर कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे या ॲपचा चुकून केलेला वापरही तुम्हाला धोक्यात आणू शकतो.
हे ही वाचा :