Aadhar : Change Birth Date
Aadhar : Change Birth Date

आधारकार्ड : आता तुम्हीही घरबसल्या बदलू शकता ‘आधार’ वरील जन्मतारीख

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 
सरकारी असो वा खाजगी अशा कोणत्याही कामांसाठी आपल्याला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये ड्रायव्हींग लायसन, पॅनकार्ड, रेशन कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची गरजेची असतात. यासारखेच आजकाल आधार कार्डही यामधील महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.

शाळेत नावनोंदणी करायची आहे, सीमकार्ड खरेदी करायचे आहे, कोणतीही योजना अर्ज कींवा सरकारी अर्ज करायचाअसल्यास, या सर्व कामांसाठी आपल्याला आधार कार्ड महत्त्वाचे असते. परंतु काहीवेळा असे समोर आले आहे की, अनेकांच्या आधार कार्डमध्ये कित्येक प्रकारच्या चूका आढळून येतात.  ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील महत्त्वाची आणि कीत्येकवेळा आढळून आलेली चूक म्हणजे ' चूकीची जन्मतारख '. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये तुमची जन्मतारीख दुरुस्त करायची असेल किंवा जन्मतारीखच बदलायची असेल, तर आम्ही तुम्हाला ' आधार कार्डवरील जन्मतारीख ' घरच्या घरीच ऑनलाइन कशी बदलू शकता हे सांगणार आहोत.

याप्रकारे बदला आधार कार्डवरील जन्मतारीख

स्टेप १ : तुमच्या आधार मधील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी प्रथम UIDAI (यूआईडीएआई) च्या अधिकृत वेबसाइट https://ssup.uidai.gov.in/ssup/ वर जावे लागेल.

स्टेप २ : यानंतर या वेबसाईटवरील Process to update aadhar वर क्लिक करा. त्यानंतर याठीकाणी आपल्या आधार कार्डवरील १२ अंकी आधार क्रमांकाच्या मदतीने येथे लॉगइन करावे लागेल.

स्टेप ३ : लॉगइन केल्यानंतर याठीकाणी असलेले कॅप्चा कोड भरा आणि OTP पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, जो तुम्हाला येथे टाकावा लागेल.

स्टेप ४ : यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यावर तुमचे पुर्ण नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता टाकावा लागेल. त्यानंतर कोणत्याही कागदपत्राचे प्रूफ देत अपडेट करण्यासाठी 'Update demographics data' वर क्लिक करावे लागेल.

स्टेप ५ : आता तुम्हाला ते तपशील निवडायचे आहेत जे अपडेट करायचे आहेत. यानंतर, तुम्ही सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक Verification Code येईल. तो याठीकाणी टाका आणि यानंतर Save Change वर क्लिक करा.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news