Smart Watch : रक्तातील ऑक्सिजन आणि हृदयातील ठोक्यांवर देखरेख करतंय 'हे' स्मार्टवाॅच | पुढारी

Smart Watch : रक्तातील ऑक्सिजन आणि हृदयातील ठोक्यांवर देखरेख करतंय 'हे' स्मार्टवाॅच

पुढारी ऑनलाईन डेस्क :  या धक्काधक्कीच्या युगात आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. पण कामाच्या व्यापात काही विसरतो तर, काही वेळा त्याच्या वेळाच विसरतो. त्यामुळे आजकाल आपल्या दैनंदिनीवर हे स्मार्टवॉच नक्कीच देखरेख ठेवून, आपले दैनंदिन वेळापत्रक Follow करायला मदत करू शकते. चला तर जाणून घेऊया, Noise ColorFit Ultra Buzz या स्मार्ट वाॅचची वैशिष्ट्ये…

Noise ColorFit Ultra Buzz हे स्मार्टवॉच नुकतेच भारतात लॉन्च झाले आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे, हे माणसाच्या शरिरातील ब्लडमधील ऑक्सिजन लेव्हल (SpO2) आणि हार्ट रेटवर देखरेख (मॉनिटर) करते. या स्मार्टवॉचमध्ये वॉकिंग, हाइकिंग, साइकलिंग, रनिंग आणि स्किपिंग यांसारख्या 100 स्पोर्ट्स मोड्स समाविष्ट करण्यात आले आहे. अशा विविध सुविधांनी सुसज्ज असलेले हे स्मार्टवॉच Amazone आणि Noise Online वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

स्मार्टवॉचचे फिचर्स

Noise ColorFit Ultra Buzz हे स्मार्टवॉच आयताकृती असून, याला 1.75-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट आहे. याद्वारे यूजर्सला थेट वॉयस कॉल रिसीव्ह करण्याची परवानी मिळते. यामध्ये स्लीप मॉनिटरिंग, हँडवॉश रिमाइंडर आणि सेडेंटरी रिमाइंडर या सुविधाही समाविष्ट आहेत. तसेच १०० स्पोर्टसमोड्सदेखील उपलब्ध आहेत.

या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट (24*7) , ऑक्सिजन लेव्हलला सपोर्ट करण्यासाठी सेंन्सरचा समाविष्ट करण्यात आला आहे. मूलभूत स्मार्टवॉच वैशिष्ट्यांमध्ये यूजर्सला स्लीप मॉनिटरिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, महिला आरोग्य ट्रॅकिंग  यांसारख्या पर्यायांचा वापर करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये पाणी पिण्याचा रिमाइंडर, आइडल रिमाइंडर, हैंड वाश रिमाइंडर और सेडेंटरी रिमाइंडर सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये स्टॉक मार्केट अपडेट आणि वर्ल्ड क्लॉकसुद्धा उपलब्ध आहे.  एखाद्या मेसेजलासुद्धा तात्काळ रिप्लाय देण्याची (क्विक रिप्लाई फीचर) सुविधाही आहे.

स्मार्टवॉचची अशी आहे किंमत

Noise ColorFit Ultra Buzz ची भारतातील किंमत ही 5,999 रुपये आहे. परंतु सध्या हे स्मार्टवॉच 3,499 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते. प्रास्ताविक किंमत टॅगसह हे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र ही सुरुवातीची किंमत किती काळ टिकेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे स्मार्टवॉच चारकोल ब्लॅक, शॅम्पेन ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button