पुढारी ऑनलाईन डेस्क : जबरदस्त फिचर्स असलेले Realme चे, Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G हे दोन नवीन स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लॉन्च झाले. हे दोन्ही स्मार्टफोन पॉवरफुल प्रोसेसर आणि अनेक पॉवरफुल फीचर्सने सुसज्ज आहेत. या नवीन स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांची मायक्रोसाइटद्वारे पुष्टी करण्यात आली आहे.
Realme उपाध्यक्ष माधव सेठ यांनी एका सांगितले आहे की, Realme च्या नवीन लॉन्च झालेल्या 9 Pro 5G स्मार्टफोनमध्ये, SD 695 5G प्रोसेसर, 120Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, 64MP नाईटस्केप कॅमेरा हे जबरदस्त फिचर्स आहेत. ब्लू आणि ग्रीन रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. Realme 9 Pro सिरीजच्या किंमती भारतीय बाजारात १५००० हजारच्या पुढे असणार आहेत. Realme रिपोर्टनुसार , Realme 9 Pro फोनची किंमत १८९९९ रुपये असेल, तर Realme 9 Pro Plus फोनची सुरुवातीची किंमत २४९९९ रुपये असणार आहे.
लवकरच यामध्ये कलर चेंजिंग बॅक पॅनलसह येईल, ज्यामध्ये फोनच्या बॅक पॅनलचा रंग सूर्यप्रकाशात बदलेल. Realme 9 Pro 5G स्मार्टफोनचा 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून realme.com आणि Flipkart वर पहिला सेल उपलब्ध होणार असल्याचेही माधव सेठ यांनी सांगितले.
50MP सोनी IMX766 OIS कॅमेरा, लाइट शिफ्ट डिझाइन, Dimensity 920 5G प्रोसेसर हे Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनची जबरदस्त फिचर्स असणार आहेत. तसेच या फोनमध्ये 60W SuperDart चार्जिंग क्षमता, सुपर AMOLED डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि NFC सपोर्ट अशीही काही वैशिष्टये असणार आहेत. हार्ट रेट सेंसर आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनचे हे खास फिचर असणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून realme.com आणि Flipkart वर याचा पहिला सेल उपलब्ध होणार आहे.