Oneplus चे दोन बेस्ट मॉडेल्स भारतात लॉन्च ; केवळ १७ मिनिटांत फुल चार्ज | पुढारी

Oneplus चे दोन बेस्ट मॉडेल्स भारतात लॉन्च ; केवळ १७ मिनिटांत फुल चार्ज

पुढारी ऑंनलाईन डेस्क : Oneplus ने More Power to you या इव्हेन्टमध्ये अनेक नवीन फोन लाॅन्च केले. यामध्ये १७ मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनचा सुद्धा समावेश आहे. या इव्हेन्टमध्ये OnePlus 10 R आणि OnePlus Nord CE 2 Lite 5G हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले. या स्मार्टफोनच्या सुरूवातीची किंमत १९ हजार ९९९ रूपये इतकी आहे.

जर तुम्हीही वन प्लसचे (OnePlus) चाहते असाल, तो खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर, जाणून घ्या या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत

OnePlus 10R 5G ची ही आहे खासियात

OnePlus 10R 5G हा स्मार्टफोन भारतात दोन मॉडेलमध्ये लाँच केला आहे. यामध्ये एक 150W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह Endurance Edition आणि 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट असलेलले मॉडेल आहेत. या स्मार्टफोनला 6.7-इंचाचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. या फोनच्या डिझाइनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max चिपसह, कूलिंग सिस्टम आणि हायपरबूस्ट गेमिंग इंजिनही आहे. ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

OnePlus 10R 5G फोनमध्ये ड्युअल नॅनो सिम सपोर्ट येतो. यामधील चिपसेट 3D पॅसिव्ह कूलिंग तंत्रज्ञानासह जोडलेले आहे, जे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. OnePlus 10R 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा येतो. 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्राथमिक सेन्सर आहे, जो f/1.88 लेन्ससह जोडलेला आहे. समोर 16-मेगापिक्सेल Samsung ISOCELL S5K3P9 सेन्सर आहे ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी EIS सपोर्टसह f/2.4 लेन्स आहे. हा स्मार्टफोन 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह सुसज्ज आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

OnePlus 10R 5G Endurance Edition मॉडेलची ही आहेत वैशिष्ट्ये : या मॉडेलमध्ये 150W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी येते, ज्याच्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, फोन फक्त 17 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. हे मॉडेल 80W SuperVOOC जलद चार्जिंगसोबत 5000mAh बॅटरी देते. फोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट यांचा समावेश आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची ही आहे खासियात

हा स्मार्टफोन ड्युअल नॅनो सिमला सपोर्ट करतो आणि याचा 6.59-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये f/1.7 अपर्चरसह 64-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, फोन f/2.0 अपर्चरसह 16-मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेन्सर आहे. हँडसेट 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, 3.5mm ऑडिओ जॅक, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 30 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होतो.

अशा आहेत याच्या किंमती

OnePlus 10R 5G : OnePlus 10R 5G च्या 8+128GB (80W/5000mAh) व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे, 12+256GB (80W/5000mAh) व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर फोनच्या एन्ड्युरन्स एडिशनच्या फक्त 12+256GB (150W/4500mAh) व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये आहे. याची विक्री 4 मे पासून सुरू होणार आहेत. हे स्मार्टफोन OnePlus.in, OnePlus Store App, OnePlus Exclusive Store, Amazon, Reliance Digital Store, Croma Stores आणि निवडक भागीदार स्टोअरमधून खरेदी करता येणार आहेत. हा फॉरेस्ट ग्रीन आणि सिएरा ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

OnePlus Nord CE 2 Lite 5G : OnePlus Nord CE 2 Lite 5G फोनच्या 6+128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8+128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. त्याची खुली विक्री 30 एप्रिलपासून सुरू होईल. हे OnePlus.in, OnePlus Store App, OnePlus Exclusive Store, Amazon, Reliance Digital Store, Croma Stores आणि निवडक भागीदार स्टोअरमधून खरेदी करता येणार आहेत. हा फोन ब्लॅक डस्ट आणि ब्लू टाइड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

A OnePlus Launch Event

Back to top button