पुढारी ऑनलाईन न्यूज : Tesla CEO Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मस्क यांनी नुकतेच मायक्रो-ब्लॉगिंग साईट Twitter मध्ये जवळपास 9 टक्के हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. पण आता एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार मस्क हे 9 टक्क्यांच्या हिस्सेदारीवर खूश नसून त्यांना संपूर्ण Twitter च विकत घ्यायचे आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, एलन मस्क यांनी Twitter Inc खरेदी करण्यासाठी कंपनीला एक ऑफर दिली आहे. Elon Musk यांनी सांगितलंय की, ट्विटरमध्ये खूप पोटेंशियल आहे. त्यामुळे ते यात इंटरेस्ट दाखवत आहेत.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, एलन मस्क (Elon Musk) यांनी यासाठी Twitter Inc कंपनीला सुमारे 41 बिलियन डॉलर (सुमारे 3120.00 अब्ज रुपये) ऑफर दिली आहे. त्यांनी कंपनीचे प्रति शेअर 54.20 डॉलर (सुमारे 4,100 रुपये)ने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.
टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी 4 एप्रिल रोजी ट्विटरमधील सुमारे 9 टक्के हिस्सेदारीवर कब्जा केला. तेव्हापासून ट्विटरच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मस्क यांनी ट्विटरचे चेअरमन ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ट्विटरला खासगी कंपनीत बदलण्याची गरज आहे.
त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर मला असे उमगले की, ही कंपनी सध्या जशी आहे त्यात काही वाढ होणार नाही, तसेच कंपनी तिचे इच्छित ध्येयही गाठू शकणार नाही. कंपनीला विकत घेण्याची माझी ऑफर खूप चांगली आहे. आणि जर ती स्विकारली नाही तर मी शेयरहोल्डर्सवरून सध्याच्या परिस्थितीवर पुनर्विचार करीन.
50 वर्षीय एलन मस्क यांनी गुरुवारी 14 एप्रिल रोजी यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या प्रस्तावात नव्या निर्णयाची घोषणा केली. मस्क म्हणाले, 'मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली कारण जगभरातील मुक्त संवासासाठी व्यासपीठ बनण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की भाषण स्वातंत्र्य ही कार्यशील लोकशाहीची गुरुकिल्ली आहे.'
या आठवड्याच्या सुरुवातीला, मस्क यांनी ट्विटर बोर्डमध्ये सामील होण्याची योजना रद्द केली. त्यामुळे बोर्डाच्या जागेपासून दूर गेल्याने कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता धूसर झाली आहे. कंपनीत स्टेक घेतल्यानंतर मस्क यांनी ट्विटरबद्दल ट्विट करायला सुरुवात केली. त्यांनी बेघरांना निवारा बनवण्याबद्दल आणि ट्विटला एडिट बटण देण्याबद्दल ट्विटर हेडक्वार्टरशी बोलणे सुरू केले.
याशिवाय, प्रीमियम युजर्सना ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन देण्याबाबतही त्यांनी सांगितले. त्यांच्या एका ट्विटनुसार, ट्विटरची स्थिती चांगली नाही कारण जास्त फॉलोअर्स असलेले अनेक सेलिब्रिटी खूपच कमी ट्विट करतात, असे एलन मस्क यांचे म्हणणे आहे.
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (CEO) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक नोट शेअर हरत एलन मस्क ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार नाहीत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.
टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क सक्रिय असतात. ट्विटच्या माध्यमातून ते युजर्सशी संवाद साधत असतात. काहीवेळा त्यांचे ट्विट खूप मजेशीर असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरचे 9 टक्के शेअर्स खरेदी केले होते. त्याची किंमत तब्बल २.८ बिलियन डॉलर इतकी आहे. ते ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर ठरले आहेत. त्यांनी आपल्या 81 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या ट्विटर अकाउंटवर ट्विटर संबधित काही पोल घेतले होते.