Tata Technologies IPO listing | ‘टाटा टेक’च्या ‘आयपीओ’चं बंपर लिस्टिंग! गुंतवणूकदारांना १४० टक्के नफा

Tata Technologies IPO listing | ‘टाटा टेक’च्या ‘आयपीओ’चं बंपर लिस्टिंग! गुंतवणूकदारांना १४० टक्के नफा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : टाटा टेक्नॉलॉजीसच्या 'आयपोओ'मध्ये पैसे लावणारे गुंतवणूकदार आज मालामाल झाले. आज सकाळी १० वाजता या कंपनीच्या 'आयपीओ'ने शेअर बाजारात दमदार पदार्पण केले. Tata Technologies चे शेअर्स आज गुरुवारी एक्सचेंजेसवर १४० टक्क्यांच्या (७०० रुपयांनी वाढून) च्या प्रीमियमवर लिस्टिंग झाले. सुरुवातीच्या व्यवहारात एनएसई (NSE) आणि बीएसईवर (BSE) ५०० रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर्सची किंमत १२०० रुपयांवर गेली. त्यानंतर त्याने १६० टक्क्यांच्या वाढीसह १,३०२ रुपयांवर उसळी घेतली. (Tata Technologies IPO listing)

सुमारे १९ वर्षानंतर प्रथमच बाजारात आलेला टाटा समुहातील या कंपनीचा IPO ऑफर फॉर सेल इश्यू असूनही त्याला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

संबंधित बातम्या 

या शेअरने एनएसईवर १,२०० रुपये आणि बीएसईवर १,१९९ रुपयांवर व्यवहार सुरू केला. तर त्याची इश्यू किंमत ५०० रुपये होती. याचाच अर्थ आयपीओ गुंतवणूदारांना १४० टक्क्यांची तेजी मिळाली.

टाटा टेक्नॉलॉजीजचा इनिशिअल पब्लिक ऑफर म्हणजे आयपीओ (IPO) हा सुमारे १९ वर्षानंतर आलेला टाटा समुहातील (Tata Group) पहिला आयपीओ आहे. याचे आज शेअर बाजारात लिस्टिंग झाले.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Tech IPO) ३,०३४ कोटींच्या IPO ने एलआयसी (LIC) चा विक्रम मोडला होता. टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ २१ हजार कोटींचा होता. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या 'आयपीओ'साठी विक्रमी ७३.५८ लाख अर्ज आले. टाटा टेक आयपीओ (Tata Tech IPO) ला ६९.४३ पट ओव्हरसबस्क्राइब केले गेले. त्यासाठी गुंतवणूकदारांनी ७३.५८ लाख अर्ज करून १.५७ लाख कोटी रुपये मोजले होते.

गंधार ऑइलच्या शेअर्सलाही चांगला प्रतिसाद

टाटा टेक्नॉलॉजीसह गंधार ऑइल आणि फेडबँक फायनान्शिअल या तीन कंपन्या आज शेअर बाजारात प्रवेश केला. गंधार ऑइलच्या शेअर्सनी गुरुवारच्या व्यवहारात एनएसईवर ७६ टक्क्यांच्या (१२९ रुपयांनी वाढून) प्रीमियमवर पदार्पण केले. एनएसईवर हा शेअर २९८ रुपयांवर लिस्ट झाला, तर बीएसईवर त्याने २९५.४ रुपयांवर व्यवहार सुरु केला. तो १६९ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. (Tata Technologies IPO listing)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news