आयकर : विवाहातील भेटवस्तू करकक्षेत, जाणून घ्या नियम | पुढारी

आयकर : विवाहातील भेटवस्तू करकक्षेत, जाणून घ्या नियम

मिलिंद सोलापूरकर

विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण राहते. पाहुणे येतात आणि यात दोन्ही बाजूंकडील कुटुंबीय सहभागी होतात. प्रामुख्याने वधू पक्षाकडून वर पक्षाला मोठ्या प्रमाणात भेटवस्तू दिल्या जातात. सर्वांचा उद्देश नवदाम्पत्यांच्या नव्या संसारात आनंदाचा वर्षाव करणे. पण विवाहात मिळणार्‍या भेटवस्तूंवर आकारण्यात येणार्‍या करांचाही विचार केला पाहिजे. वास्तविक, भेटवस्तू करकक्षेत येतात. त्यामुळे यासंदर्भातील नियम जाणून घेतल्यास जोडप्यांना आणि पाहुण्यांना भेटवस्तू देताना आणि स्वीकारताना संभाव्य कराचा अंदाज राहतो.

भेटवस्तूंवरील कर

वेगवेगळ्या देशांत विवाहाप्रसंगी मिळणार्‍या भेटवस्तूंवरची कर आकारणी हे त्याचे स्वरूप आणि मूल्यांवर अवलंबून असते. सामान्यपणे कर अधिकारी हे भेटवस्तूला उत्पन्नाच्या श्रेणीत ठेवतात. त्यामुळे कर आकारला जातो. अर्थात, विशेेष नियम हे कॉम्प्रेन्सिव्ह रूपातून वेगवेगळे राहू शकतात. म्हणूनच भेटवस्तूंवरचा कर कमी राहण्यासाठी स्थानिक नियमांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.

कोणते मार्ग आहेत?

भेटवस्तूचा समावेश न करणे आणि मर्यादा : अनेक कर अधिकारी करमुक्त भेटवस्तूंच्या मूल्यांचा करात समावेश करत नाहीत. पण त्यासाठी काही मर्यादा आखून दिल्या आहेत. या मर्यादा जाणून घेणे गरजेचे आहे. यानुसार विवाहात मिळणार्‍या भेटवस्तू करपात्र आहेत की नाहीत, हे समजते.

भेटवस्तूंची विभागणी : जोडपे भेटवस्तूंची विभागणी करण्याचा विचार करू शकतात. या ठिकाणी दोघे भागीदार कराचा भार हलका करू शकतात. ही बाब फायदेशीर राहू शकते. जोडीदारापैकी एकाचे उत्पन्न कमी असेल किंवा तो कमी स्लॅबमध्ये असेल, तर त्याच्याकडे भेटवस्तूंचे प्रमाण अधिक ठेवता येऊ शकते.

कुटुंबाकडून भेटवस्तू : काही ठिकाणी जवळच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या भेटवस्तूंना करसवलत दिली आहे. मात्र जोडीदारांना त्या नात्यांची माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या नातेवाइकांनी दिलेली भेटवस्तू करमुक्त आहे, हे जाणून घेतले पाहिजे. कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेली भेटवस्तू ही प्रासंगिक नियमांचे पालन करत आहे की नाही, हे पाहिले पाहिजे.

कागदपत्रे आणि सूचना : मिळालेल्या भेटवस्तूंचे मूल्य आणि स्रोत याची काळजीपूर्वक नोंद ठेवायला हवी. कर अधिकार्‍यांना त्याची माहिती देताना पारदर्शकता आणि नियमांचे पालन करायला हवे. भेटवस्तूंचे सविस्तर विवरण हे फायदेशीर राहू शकते.

करमुक्त भेटवस्तूंचा वापर : काही देशांत विवाहात मिळणार्‍या भेटवस्तूंना करसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नव जोडप्यांना एका ठरावीक मर्यादेपर्यंत करमुक्त रक्कम प्राप्त करता येते. या सवलती समजून घेणे आणि त्याचा लाभ उचलल्यास अनावश्यक कराच्या ओझ्यातून बचाव होऊ शकतो.

व्यावसायिक सल्ला : कर कायद्याचा किचकटपणा आणि त्यातील वैविध्य पाहता, कर सल्लागाराशी चर्चा करणे फायदेशीर आहे. एक कर सल्लागार जोडप्यांना परिस्थितीनुरूप आणि स्थानिक नियमांच्या आधारावर वैयक्तिक माहिती प्रदान करू शकतो. सध्या विवाहाचा काळ आहे. त्यामुळे जोडप्यांनी आणि पाहुण्यांनी विवाहात देण्यात येणार्‍या भेटवस्तूंशी संबंधित कर आकारणीबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. नियम समजून घेतल्याने, सवलतीचा लाभ उचलल्याने आणि कायदेशीर सल्ला घेतल्याने कर कायद्यातील किचकटपणा कमी राहतो. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम म्हणजे चांगल्या क्षणी दिलेल्या भेटवस्तूंवरील कर भरण्याचा ताण आनंदावर विरजन घालणार नाही. योग्य पावले उचलत अनावश्यक करांच्या आकारणीबाबतचा विचार न करता, जवळच्या नातेवाइकांनी दिलेल्या भेटवस्तूंचा आनंद घ्यायला हवा.

Back to top button