वीज कडाडत असताना काय काळजी घ्यावी ?

वीज कडाडत असताना काय काळजी घ्यावी ?
Published on
Updated on
 पुढारी ऑनलाईन डेस्क 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  राज्यात काही ठिकाणी गेले दोन दिवस पाऊस विजांच्या कडकडाटासह पडत आहे. काही ठिकाणी विजेपासुन नुकसानही झाले आहे. हे नुकसान होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी हे आम्ही जाणून घेऊया…
उन्हाच्या काहिलीनंतर अखेर राज्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस गेले दोन दिवस पडत आहे. आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस सुरु झाला की अनेक समस्या उदभवतात त्यापैकी एक म्हणजे म्हणजे विजेचा धक्का (lightning strikes) बसणे. वरवर पाहता अतिशय छोटी वाटणारी ही समस्या फारच गंभीर आहे. जर आपण अगोदरच काळजी घेतली तर या समस्या उदभवणार नाहीत.
  • जर का तुम्ही  शेतात काम करीत असाल तर  शेताजवळील शेतातील सुरक्षित ठिकाणी जा. तिथे पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.
  • झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. कारण उंच झाडे वीज आकर्शित करत असतात.
  • झाडाखाली, विजेच्या खांबाखाली, टॉवर,  टेलिफोन बुथजवळ उभे राहणे टाळा.
  • विजा चमकत असतील तर मोबाईल टाळा.
  • पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • ओल्या ठिकाणी असाल तर तात्काळ कोरड्या ठिकाणी जा.
  • मोकळ्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त मोकळ्या मैदानात पडतात.
  • चारचाकी किंवा दुचाकीवरुन  प्रवास करीत असल्यास, अशावेळी वाहनातून प्रवास करू नका. सुरक्षित ठिकाणी थांबावे.
  • वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
  • एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर असावे.
  • पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, त्यापासून दूर रहा.

हेही वाचलतं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news