Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहकडून सरावाचा श्रीगणेशा

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहकडून सरावाचा श्रीगणेशा
Published on
Updated on

बेंगळूर; वृत्तसंस्था : सध्या तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील असणारा जसप्रित बुमराह येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हलका सराव करत असून, रोज किमान 7 षटके गोलंदाजीस त्याने सुरुवात केली आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतातच होणार्‍या आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेसाठी बुमराह विशेष महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, सप्टेंबर 2022 नंतर त्याला एकही सामना खेळता आलेला नाही. सप्टेंबरमध्ये तो मायभूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत सहभागी झाला. त्यानंतर मात्र पाठदुखीमुळे त्याला सातत्याने बाहेर राहावे लागले. (Jasprit Bumrah)

पाठीच्या दुखण्यामुळेच 29 वर्षीय बुमराहला गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेला देखील मुकावे लागले. त्या स्पर्धेत भारताला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. अगदी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील भारताला बुमराहची प्रकर्षाने उणीव जाणवली. याच महिन्यात झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 209 धावांनी धुव्वा उडवला होता. (Jasprit Bumrah)

के.एल., श्रेयसही तंदुरुस्तीच्या मार्गावर

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत के.एल. राहुल व श्रेयस अय्यर हे देखील तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील असून ते देखील लवकरच निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज आहे. यापूर्वी के.एल. राहुलला यंदा आयपीएलमध्ये कमरेची दुखापत झाली होती तर श्रेयसला पाठीची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली आहे. के.एल. राहुल जुलैमध्ये सरावाला सुरुवात करू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रेयस वेळेत उपलब्ध झाला नाही तर त्याच्याऐवजी संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला पसंती मिळू शकते.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news