Hockey India : हॉकी इंडियाचा पॅडी उप्टनशी नवा करार | पुढारी

Hockey India : हॉकी इंडियाचा पॅडी उप्टनशी नवा करार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी उप्टन यांना हॉकी इंडियाने करारबद्ध केले असून या करारानुसार, पॅडी उप्टन आगामी आशियाई स्पर्धा व आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला मार्गदर्शन करणार आहेत. हॉकी इंडियाने ट्विट करत याची माहिती दिली. आगामी आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धा यंदा चेन्नईत, तर आशियाई स्पर्धा हँग्झू येथे होणार आहे. (Hockey India)

दक्षिण आफ्रिकन पॅडी उप्टन यापूर्वी 2011 आयसीसी वन-डे विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या सहायक पथकात समाविष्ट होते. त्यांनी गतवर्षी ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही रोहितसेनेसह काम केले आहे. पॅडी उप्टन यांना यापूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या सहायक पथकात घेतले होते. स्वत: गॅरी 2008 मध्ये भारतीय क्रिकेट संघाशी करारबद्ध झाले होते. (Hockey India)

हेही वाचा;

Back to top button