ॲश्ले बार्टी; क्रिकेटचे मैदान सोडून विंबल्डन गाजवणारी हरहुन्नरी खेळाडू

विंबल्डनवर नाव कोरणारी अॅश्ले बार्टी
विंबल्डनवर नाव कोरणारी अॅश्ले बार्टी

[visual_portfolio id="5340"]

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाच्या ॲश्ले बार्टी या हरहुन्नरी खेळाडूने विंबल्डनवर आपले नाव कोरले. तिने केरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-३, ६-७ ( ४-७ ) ६-३ असा पराभव कोरत आपले पहिले वहिले विंबल्डन जिंकले.

याचबरोबर ती इव्होने गुलागाँग कॉव्हली ( १९८० ) यांच्यानंतर महिला एकेरीत विंबल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली.

ॲश्ले बार्टी सध्या वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. पण, ॲश्ले बार्टी ही फक्त टेनिस खेळाडू नाही. तिने क्रिकेटमध्येही आपला हात आजमावला होता. ती एक व्यावसायिक क्रिकेटपटू राहिली आहे.

ती २०१५ च्या बिग बॅश लीग या ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध व्यावसायिक टी – २० स्पर्धेतही खेळली आहे.

अधिक वाचा :

बाल वयातच टेनिसचे धडे

ॲश्ले बार्टीचा जन्म क्विन्सलँडच्या इप्सविचमध्ये २४ एप्रिल १९९६ मध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिने हातात टेनिसची रॅकेट घतली. तिला टेनिसमध्ये चांगली गती मिळाली. ती मुलींच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचली होती.

तिने २०११ ला मुलींच्या एकेरीचे विंबल्डन विजेतेपद जिंकले होते. जसजशी बार्टी मोठी होत गेली तिने दुहेरीतही आपला ठसा उमटवला. २०१३ च्या डब्ल्युटीए टूरमध्ये ती तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्यावेळी ती अवघ्या १६ वर्षाची होती.

टेनस सोडून क्रिकेटची बॅट धरली

पण, २०१४ चा हंगाम संपत आला असताना ॲश्ले बार्टीने टेनिसमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचे ठरवले. तिने टेनिसची रॅकेट सोडली आणि क्रिकेटची बॅट हातात घेतली. २०१५ ला तिने क्विन्सलँडकडून अ श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

याचबरोबर तिने १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पदही काही काळ भुषवले.

अधिक वाचा : 

ज्यावेळी २०१५ ला महिलांच्या बिग बॅश टी -२० लीगची सुरुवात झाली, त्यावेळी ती ब्रिसबेन हीट कडूनही खेळली. विशेष म्हणजे बार्टीने क्रिकेटचे कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही ती व्यावसायिक पातळीवरील क्रिकेट खेळली.

पुन्हा टेनिस कोर्टवर अवतरली

पण, त्यानंतर २०१६ मध्ये बार्टी पुन्हा टेनिसकडे वळली. तिने २०१७ ला डब्ल्युटीए मलेशियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावले. यानंतर ती जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर पोहचली.

त्यानंतर बार्टीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

तिने २०१९ मध्ये फ्रेंच ओपनवरही आपले नाव कोरले. त्यानंतर आता विंबल्डन जिंकून आपले हरहुन्नरीपण सिद्ध करुन दाखवले.

एप्रिल २०२० मध्ये ज्यावेळी संपूर्ण जग लॉकडाऊन होते त्यावेळी ती तिचा ट्रेडमार्क फोरहेड व्होलीची प्रॅक्टिस क्रिकेट बॅटने करत होती.

यावरुन तिचे दोन्ही खेळातील प्रविण्य दिसून येते. तिने क्रिकेटच्या स्किल्सचा टेनिसमध्ये अत्यंत सफाईदारपणे वापर करुन घेतला.

हेही वाचले का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news