

लंडन; पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जी याने विंबल्डन ज्युनिअर पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याने फ्रान्सच्या साचा ग्युयेमार्ड वेयनबर्गचा ७- ६, ४-६, ६-२ असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
उपांत्य फेरीतील या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोघांनीही दमदार खेळ केला. त्यामुळे चांगलीच रंगत निर्माण झाली. अखेर समीर बॅनर्जी ने सेट ७-६ असा आपल्या नावावर केला.
त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये साचाने जोरदार पुनरागमन करत सेट ६-४ असा जिंकला. त्यामुळे सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये पोहचला.
अधिक वाचा :
दुसऱ्या सेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन करणाऱ्या साचाला बॅनर्जीने तिसऱ्या सेटमध्ये फारशी संधी दिली नाही. समीर बॅनर्जीने आपला खेळ उंचावत तिसरा सेट ६-२ असा सहज खिशात टाकला. याचबरोबर त्याने आपले फायनलचे तिकिटही निश्चित केले.
दरम्यान, विंबल्डन पुरुष एकेरी वरिष्ठ गटातील अंतिम सामना हा रविवारी रंगणार आहे. हा सामना नोवाक जोकेविच आणि मॅटेनो बेराटिनी यांच्यात होणार आहे. जोकोविचने यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकले आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत १९ ग्रँड स्लॅम आहेत.
अधिक वाचा :
नुकत्यात आलेल्या बातमीनुसार महिला एकेरी वरिष्ठ गटातील अंतिम सामन्यात अश्लेघ बार्टीने कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-३, ६-७ (४-७), ६-३ असा पराभव करत आपले नाव पहिल्यांदाच विंबल्डनवर कोरले.