RCB vs RR : कोहलीच्या बेंगलोरचा सलग दुसरा विजय; राजस्थानचा ७ धावांनी पराभव

RCB vs RR : कोहलीच्या बेंगलोरचा सलग दुसरा विजय; राजस्थानचा ७ धावांनी पराभव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  फॅफ डू प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार अर्धशतकी खेळी आणि हर्षल पटेलच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर विराट कोहलीच्या आरसीबीने राजस्थानला पराभुत करत सलग दुसरा विजय मिळवला. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने १८९ धावा केल्या आणि राजस्थानसमोर १९० धावांचे आव्हान ठेवले.

आरसीबीच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला १८२ धावाच करता आल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिकलने ३४ चेंडूमध्ये ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ४७ आणि ध्रुव जुरेलने ३४ धावांचे योगदान दिले. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. त्याने ४ षटकांमध्ये ३२ धावा देत ३ बळी घेतले. तर मोहम्मद सिराज आणि डेव्हिड विलीने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

 तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार फॅफ डू प्लेसीसने ३९ चेंडूमध्ये ६२ धावांची खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेलनेही त्याला साथ देत ४४ धावांमध्ये ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. फॅफ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावरच आरसीबीला ही धावसंख्या उभारता आली. आरसीबीकडून फॅफ डू प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल शिवाय कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र, दोघेही बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. आरसीबीचे ३ खेळाडू धावबाद झाल्याने २०० धावाांचा टप्पा गाठण्यात अपयश आले.

राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्टने ४ षटकांमध्ये ४१ धावा देत २ विकेट्स पटकावल्या. तर रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी १ बळी घेतला. शिवाय आरसीबीचे ३ खेळाडू धावबाद झाल्याने २०० धावाांचा टप्पा गाठण्यात अपयश आले. फॅफ डू प्लेसीस, वहिंदू हसरंगा आणि सुयश प्रभू देसाई हे तिघेही धावबाद झाले.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन) : विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news