Yograj Singh Controversy: खेळाडूंच्या निवृत्तीला त्यांच्या बायका जबाबदार.... योगराज सिंगांची गाडी सुसाट; धोनीचंही केलं कौतुक

Yograj Singh Controversy
Yograj Singh Controversypudhari
Published on
Updated on

Yograj Singh Controversy: भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग हे त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. युवराज सिंगचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू असलेल्या योगराज सिंग यांनी आता नवं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भारताच्या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीला त्यांच्या घरातील बायका जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या प्रभावाखालीच खेळाडू निवृत्तीचा आणि करिअरचा निर्णय घेत आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Yograj Singh Controversy
Abhishek Sharma: 'रील्स, पार्ट्या आणि गर्लफ्रेंडमुळे सगळं...' युवराज सिंगचे वडील अभिषेक शर्मावर संतापले होते; नेमकं काय म्हणाले?

आता पत्नी कोच झाल्या आहेत

वादग्रस्त वक्तव्य आणि दाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या योगराज सिंग यांनी इनसाईड स्पोर्ट्सला दिललेल्या मुलाखतीत अजून एक मोठे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, 'घरातील बायका, तुमच्या पत्नी त्या आता तुम्हाला प्रशिक्षण देऊ लागल्या आहेत. त्या आता तुम्हाला सांगू लागल्या आहेत की आता तुझ्या निवृत्तीची वेळ आलेली आहे. आता कुटुंबाकडं पाहण्याची वेळ आली आहे. आपल्याला मुलं आहेत आता त्यातच रममाण हो.'

योगराज सिंग पुढे म्हणाले, 'त्यामुळं मला असं वाटतं की खेळाडू महान होत असताना त्याच्यामध्ये महिला येता कामा नयेत. फकीर आणि खेळाडू या दोघांचा कोणताही धर्म नसतो. त्यांचा वर्ग नसतो. ते देवाशी जोडले गेलेले असतात.'

Yograj Singh Controversy
IPL 2026 RCB : चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरूपी राहणार रिक्त; RCB चा ऐतिहासिक आणि भावूक निर्णय

रोहित अन् विराटवर टीका

या मुलाखतीत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक कसोटी आणि सहा वनडे सामने खेळलेल्या योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांनी त्यांचे वय आणि निवृत्तीवरून ही टिप्पणी केली होती.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ते आता फक्त वनडे सामने खेळत आहेत. या दोघांनी २०२४ च्या टी २० वर्ल्डकपनंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी वर्षापूर्वी कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली होती.

Yograj Singh Controversy
IPL 2026 : "...तर कॅमेरून ग्रीनच्‍या 25.20 कोटींच्या पगारातून कपात करा" : अश्विनने शाहरुख खानला नेमका कोणता सल्‍ला दिला?

योगराज सिंग त्यांच्याबद्दल म्हणाले होते की, 'रोहित शर्मा आणि विराट कोहली हे युवा क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना क्रिकेट सोडायचं आहे. तुमच्या आयुष्याचा उपयोग काय. जगाला दाखून द्या की तुम्ही बेस्ट आहात. संघाला तुमची गरज आहे असं जगाला भासवून द्या. तुम्ही जरी ५० वर्षाचे झालात आणि द्विशतक ठोकत असाल तर तुम्हाला कोणी संघातून वगळणार नाही.'

Yograj Singh Controversy
Ganguly Advice |"उगाच कठोर वागण्याची गरज नाही..." : सौरव गांगुलीने गौतम गंभीरला नेमका कोणता सल्‍ला दिला?

धोनीचं कौतुक

विशेष म्हणजे धोनीवर सातत्यानं टीका करणाऱ्या योगराज सिंग यांनी धोनीचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'धोनी अजून खेळत आहे. तो अजून १० वर्षे खेळू शकतो. कारण त्याने त्याचा फिटनेस हा योग्य शिस्त आणि चिकाटीनं राखला आहे. अजूनही त्याचे फोरआर्म चांगले दिसतात. जबरदस्त माणूस आहे. आपण त्याला निवृत्त हो असं सांगणारे कोण आहोत. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा नाद नाही.'

विराट कोहली आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. तर रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसेल. आयपीएलचा हंगाम हा आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना हा आरसीबी विरूद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news