Abhishek Sharma: 'रील्स, पार्ट्या आणि गर्लफ्रेंडमुळे सगळं...' युवराज सिंगचे वडील अभिषेक शर्मावर संतापले होते; नेमकं काय म्हणाले?

Abhishek Sharma IPL 2026: अभिषेक शर्माच्या खराब कामगिरीवर योगराज सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रील्स, पार्ट्या आणि मैदानाबाहेरील गोष्टींमुळे त्याचा फोकस कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
Abhishek Sharma
Abhishek SharmaPudhari
Published on
Updated on

Abhishek Sharma Criticism Yograj Singh IPL 2026 Focus Issue: इंडियन प्रीमियर लीगचा 19वा हंगाम 28 मार्च पासून सुरू होत आहे. टी20 विश्वचषकात अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा असतील. तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. अभिषेक शर्माला खुद्द त्याचे मार्गदर्शक युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग यांनी फटकारले होते.

वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप शो आणि दबाव

अभिषेक शर्मा नुकत्याच झालेल्या ICC Men's T20 World Cup 2026 मध्ये अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. आठ सामन्यांत त्याने फक्त 141 धावा केल्या. सुरुवातीच्या तीन सामन्यांत तर तो खातेही उघडू शकला नाही. सुपर-8 मध्ये एक अर्धशतक आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेले अर्धशतक वगळता संपूर्ण स्पर्धेत तो चांगला खेळू शकला नाही. विशेष म्हणजे स्पिन गोलंदाजांसमोर तो बाद होत आहे. मोठी खेळी करण्याऐवजी तो लवकर बाद होत होता.

Abhishek Sharma
IPL 2026: RCB विरुद्ध SRH सामन्यासाठी आजपासून ऑनलाइन तिकीट विक्री सुरू; किंमत आणि बुकिंग कशी करायची जाणून घ्या

“फक्त सिक्स मारणं म्हणजे क्रिकेट नाही”

योगराज सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, अभिषेकचं लक्ष क्रिकेटपासून विचलित होत आहे. त्यांच्या मते, फक्त मोठे शॉट्स मारणं म्हणजे क्रिकेट नाही. त्यांनी सांगितलं की, आजच्या तरुण खेळाडूंना काय होतंय? त्यांनी शुभमन गिलचाही उल्लेख करत म्हटलं की अपयश तेव्हाच येतं जेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे असतं.

“रील्स, पार्ट्या आणि ग्लॅमरमुळे फोकस बिघडला ”

योगराज सिंह इथेच थांबले नाहीत. त्यांनी अभिषेकवर गंभीर आरोप करत सांगितलं की, मैदानाबाहेरील गोष्टी त्याच्या कामगिरीवर परिणाम करत आहेत. त्यांच्या मते, “तो मुलगा सतत रील्स बनवत फिरतो. हे त्याचं काम नाही.”

पुढे त्यांनी सांगितलं की “पार्ट्या, मुली, पैसा आणि शूटिंग... या सगळ्या गोष्टी खेळाडूचं लक्ष विचलित करतात.” त्यांनी जुन्या शिस्तीचा दाखला देत सांगितलं की, खेळाडूंनी रात्री 9 वाजता झोपावं, सकाळी 5 वाजता उठून सराव करावा आणि दररोज किमान 1000 चेंडू नेटमध्ये खेळावेत.

Abhishek Sharma
Shane Warne: RRच्या विक्रीनंतर शेन वॉर्नच्या कुटुंबाला 460 कोटी रुपये मिळणार; एक निर्णय ठरला गेमचेंजर

“मी खूप नाराज आहे”

योगराज सिंह यांनी सांगितलं की ते अभिषेकला अनेकदा मेसेज करून समजावतात. “मी त्याला सांगतो. हा खेळ हलक्यात घेऊ नकोस. तो प्रत्येक वेळी ‘जी सर’ म्हणतो, पण बदल करत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी क्रिकेटच्या बेसिक्सवरही जोर दिला. एकेरी, दुहेरी धावा आणि संयम क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे. “प्रत्येक चेंडू हवेत मारून चालत नाही. सतत सिक्स मारून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं.

IPL 2026 आधी मोठी परीक्षा

आता सगळ्यांची नजर अभिषेक शर्मा वर आहे. तो Sunrisers Hyderabad साठी ओपनिंग करताना दिसणार आहे. या सगळ्या टीकेनंतर तो मैदानात कसा खेळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news