WTC 2027 Final Qualification : बांगलादेशचा पराभव भारताच्या पथ्यावर! WTC 2027 फायनलमध्ये टीम इंडिया धडक मारणार का?

ऑस्‍ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघाने गुणतालिके पटकावले अव्‍वल स्‍थान
WTC 2027 Final Qualification
WTC 2027 Final QualificationFile Photo
Published on: 
Updated on: 

WTC 2027 final qualification scenarios for India : कसोटी क्रिकेटमध्‍ये घडलेल्‍या दोन महत्त्‍वाच्‍या घडामोडींमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्‍या फायनलमध्‍ये धडक मारण्‍याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात विद्यमान चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील अव्वल स्थानच गमवावे लागले नाही, तर आयसीसी कसोटी क्रमवारीतही संघाला आपले अग्रस्थान गमावावे लागले आहे.

भारतीय संघ WTC गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर

शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात विद्यमान चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे बांगलादेशला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाचा फायदा भारताला झाला असून, भारतीय संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या पुढे सध्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारखे संघ आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने सध्याची स्थिती काय आहे, हे जाणून घेऊया.

WTC 2027 Final Qualification
WTC Final: डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर, ‘या’ मैदानावर रंगणार महासंग्राम; भारत शर्यतीत कितव्या नंबरवर?

WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला किती संधी?

केपटाऊन आणि ढाका येथील दोन कसोटी सामन्यांनंतर फायनलच्या शर्यतीत मोठे फेरबदल झाले आहेत. रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता तब्बल ९१ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाची शक्यता घसरून ६६ टक्क्यांवर आली आहे. हे दोन्ही संघ यंदाही अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या हंगामातील अंतिम सामनाही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच झाला होता. अंतिम सामन्‍यात आफ्रिकेने बाजी मारली होती.

भारतापेक्षा न्‍यूझीलंड संघाला अधिक संधी

न्यूझीलंडच्या फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता ३९ टक्के असून भारताची शक्यता अवघी ३ टक्के उरली आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघ या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता १ टक्क्यापेक्षाही कमी आहे.

WTC 2027 Final Qualification
IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WTC..! भारत-न्यूझीलंड 'Final'मध्ये भिडणारे पहिलेच प्रतिस्पर्धी

भारत WTC 2027 च्या फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

भारताचे उर्वरित सामने: न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी (विदेशान); ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी (घरच्या मैदानात)श्रीलंकेविरुद्धची कोलंबो कसोटी अनिर्णित राखल्याने भारत सध्या ५१.५२ टक्के गुणांसह (PCT) चौथ्या स्थानावर आहे. भारताने उर्वरित सातही कसोटी सामने जिंकल्यास त्यांचा PCT ७०.३७ वर पोहोचेल. सहा सामने जिंकल्यास भारत ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. भारताने पाच सामने जिंकून एक सामना अनिर्णित राखला, तर अंतिम फेरीसाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंडमध्ये ०-२ असा पराभव झाल्यास आणि त्यानंतर घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला ५-० ने हरवल्यास भारताचा PCT ५९.२६% वरच राहील. मात्र ही टक्‍केवारी पहिल्या दोन स्थानांमध्ये जाण्यासाठी अपुरी असेल.

WTC 2027 Final Qualification
WTC Final : लॉर्ड्सवर स्टार्क-हेजलवूडच्या फलंदाजीचा झंझावात! 50 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोडले

दक्षिण आफ्रिकेचा मार्ग सर्वात सोपा

दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्यांदा डब्ल्युटीसी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित ७ पैकी अवघे ४ सामने जिंकायचे आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडला १० पैकी ७, तर ऑस्ट्रेलियाला ९ पैकी ६ सामने जिंकणे अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यात यश मिळाले नाही, तर ते फायनलच्या शर्यतीतून बाहेरही फेकला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.