WPL 2026 सुरू होण्यपूर्वीच 'RCB'ला झटका! 'मॅच विनर' खेळाडू अचानक बाहेर

WPL 2026 : मुख्य प्रशिक्षकांनी दिली दुखापतीबाबत माहिती
WPL 2026 सुरू होण्यपूर्वीच 'RCB'ला झटका! 'मॅच विनर' खेळाडू अचानक बाहेर
Published on
Updated on

wpl 2026 rcb match winner player pooja vastrakar miss initial matches

बेंगळुरू : महिला प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाचा थरार आजपासून (९ जानेवारी) सुरू होत आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाची स्टार वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिला प्रीमियर लीगचा हा हंगाम सर्वच खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आगामी जून महिन्यात होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही एक उत्तम तयारी मानली जात आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या मेगा लिलावानंतर अनेक संघांची रचना बदलली असून, आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केलेल्या पूजा वस्त्राकरच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या गोलंदाजीच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

WPL 2026 सुरू होण्यपूर्वीच 'RCB'ला झटका! 'मॅच विनर' खेळाडू अचानक बाहेर
IND vs NZ 1st ODI : जैस्वाल-पंत कट्ट्यावरच..! पहिल्या ‘वन-डे’साठी ‘अशी’ असणार भारतीय 'प्लेइंग इलेव्हन'

मुख्य प्रशिक्षकांनी दिली दुखापतीबाबत माहिती

पूजा वस्त्राकर सध्या बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सिलेंस' (COE) मध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. तिच्या प्रकृतीबाबत माहिती देताना आरसीबी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक मालोलन रंगराजन म्हणाले, ‘‘दुर्दैवाने पूजाच्या रिहॅब प्रक्रियेत काही अडचणी आल्या आहेत. खांद्याच्या दुखापतीमुळे ती तिथे दाखल झाली होती आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिला डिस्चार्ज मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता तिला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.’’

WPL 2026 सुरू होण्यपूर्वीच 'RCB'ला झटका! 'मॅच विनर' खेळाडू अचानक बाहेर
WPL Records : सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? मुंबई इंडियन्सचे वर्चस्व

प्रशिक्षकांनी पुढे असेही स्पष्ट केले की, पूजाला आता 'हॅमस्ट्रिंग'चा त्रास जाणवत आहे. तिच्या प्रकृतीत आठवड्यागणिक होणारी सुधारणा पाहूनच ती संघात कधी सामील होईल, याचा निर्णय घेतला जाईल. तरीही ती लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

WPL 2026 सुरू होण्यपूर्वीच 'RCB'ला झटका! 'मॅच विनर' खेळाडू अचानक बाहेर
Shreyas Iyer Comeback : श्रेयस अय्यर तंदुरुस्त; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार म्हणून पुनरागमन निश्चित

मुंबई इंडियन्सचे पारडे जड

डब्ल्यूपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे वर्चस्व दिसून येते. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सने ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर आरसीबीला ३ सामन्यांत यश आले आहे. ९ जानेवारीला होणाऱ्या सलामीच्या सामन्यात आरसीबी या पराभवाचा वचपा काढणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news