Samreen Kaur: मिस इंडिया फायनलिस्ट आणि कोट्यवधींची संपत्ती; अर्शदीपची गर्लफ्रेंड समरीन काय करते? पुण्याशी आहे खास कनेक्शन

Who Is Arshdeep Singh's Girlfriend Samreen Kaur: भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंहने आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड समरीन कौर चर्चेत आली आहे.
Samreen Kaur
Samreen KaurPudhari
Published on
Updated on

Who Is Arshdeep Singh's Girlfriend Samreen Kaur: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड समरीन कौर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अर्शदीपने इन्स्टाग्रामवर "My Person" असे कॅप्शन देत समरीनसोबतचे फोटो शेअर केल्यानंतर दोघांच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं.

मात्र, समरीन कौर ही केवळ अर्शदीप सिंहची गर्लफ्रेंड नाही. तर ती मिस इंडिया फायनलिस्ट, अभिनेत्री, मॉडेल आणि लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

कोण आहे समरीन कौर?

समरीन कौरचा जन्म 7 सप्टेंबर 1999 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. 2018 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व केले आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात करिअर सुरू केले आणि मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

पुण्यातून घेतले उच्च शिक्षण

समरीनने सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, पुणे येथून बी.कॉम (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम

समरीन कौरने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कबीर खान दिग्दर्शित '83', ZEE5 वरील 'Nail Polish', तसेच पंजाबी चित्रपट 'Sardaar Ji 2' मध्ये ती झळकली आहे.

याशिवाय ती बादशाह, गुरु रंधावा, जुबिन नौटियाल, जस मानक आणि मनिंदर बुट्टर यांसारख्या प्रसिद्ध गायकांच्या म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

सोशल मीडियावर लाखो चाहते

समरीन सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 4.6 दशलक्ष (46 लाखांहून अधिक) फॉलोअर्स आहेत. ती फॅशन, ट्रॅव्हल, फिटनेस आणि लाइफस्टाइलशी संबंधित पोस्ट नियमितपणे शेअर करत असते. दुसरीकडे, अर्शदीप सिंहचे इन्स्टाग्रामवर 6 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अर्शदीप आणि समरीनच्या नात्याची चर्चा कधी सुरू झाली?

दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा IPL 2026 दरम्यान सुरू झाली होती. समरीनला अनेकदा पंजाब किंग्सच्या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित राहून अर्शदीपला प्रोत्साहन देताना पाहिले होते. त्यानंतर दोघांचे फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाले. अखेर अर्शदीपने इन्स्टाग्रामवर "My Person" या कॅप्शनसह फोटो शेअर करत या नात्याची अधिकृत घोषणा केली.

Samreen Kaur
Spider Man Box Office: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 'पठाण', 'टायगर' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, किती कोटी कमावले?

समरीन कौरची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समरीन कौरची अंदाजे एकूण संपत्ती 8 ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तिच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणजे मॉडेलिंग, अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट, म्युझिक व्हिडिओ आणि डिजिटल कंटेंट. अर्शदीप सिंहसोबतच्या तिच्या नात्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Samreen Kaur
Mahima Makwana: 'मुसाफिर कॅफे'च्या प्रीतीचं मराठी कनेक्शन; अभिनेत्री महिमा मकवाना म्हणाली, "मी पक्की मराठमोळी आहे"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news