Spider Man Box Office: 'स्पायडर-मॅन'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 'पठाण', 'टायगर' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, किती कोटी कमावले?

Spider Man Brand New Day Box Office: स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ने भारतात अवघ्या तीन दिवसांत 180.20 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
Spider Man Brand New Day Box Office
Spider Man Brand New Day Box OfficePudhari
Published on
Updated on

Spider Man Brand New Day Box Office: टॉम हॉलंड, झेंडाया आणि सॅडी सिंक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' या हॉलीवूड चित्रपटाने जगभरासह भारतातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत भारतात 180.20 कोटी रुपयांची नेट कमाई करत या चित्रपटाने अनेक मोठ्या हॉलीवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

विशेष म्हणजे, या चित्रपटाने शाहरुख खानचा 'पठाण', सलमान खानचा 'टायगर 3' आणि रणवीर सिंहचा 'धुरंधर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या पहिल्या तीन दिवसांच्या कमाईलाही मागे टाकले आहे.

तीन दिवसांत 180 कोटींचा टप्पा

बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacnilk च्या आकडेवारीनुसार, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे ने भारतात पहिल्या तीन दिवसांत 180.20 कोटी रुपयांची नेट, तर 215.48 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी 60.60 कोटी रुपये (72.44 कोटी ग्रॉस) कमावले. दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित घट झाली आणि 49.35 कोटी रुपये (59.03 कोटी ग्रॉस) व्यवसाय झाला. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पुन्हा जोरदार मुसंडी मारत 70.25 कोटी रुपये नेट आणि 84.01 कोटी रुपये ग्रॉस कमाई केली.

'पठाण', 'टायगर 3' आणि 'धुरंधर'चे विक्रम मोडले

पहिल्या तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे ने अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे.

  • पठाण – 161 कोटी रुपये

  • टायगर 3 – 144 कोटी रुपये

  • धुरंधर – 102 कोटी रुपये

या तुलनेत स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे ने 180.20 कोटी रुपयांची कमाई करत मोठी आघाडी घेतली आहे.

Spider Man Brand New Day Box Office
Mahima Makwana: 'मुसाफिर कॅफे'च्या प्रीतीचं मराठी कनेक्शन; अभिनेत्री महिमा मकवाना म्हणाली, "मी पक्की मराठमोळी आहे"

2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'पठाण' त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता. तर 'टायगर 3' हा सलमान खानच्या सर्वाधिक दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये गणला जातो. तरीही स्पायडर-मॅनने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.

जगभरातही कमाईचा पाऊस

भारताप्रमाणेच जागतिक बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने मोठा प्रभाव टाकला आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात सुमारे 5,725 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यापैकी सुमारे 2,900 कोटी रुपये परदेशातील बाजारपेठेतून आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spider Man Brand New Day Box Office
Kangana Ranaut Hrithik Roshan: 'आग भडकवण्याचे काम करू नकोस...' कंगना रणौतचा हृतिक रोशनला इशारा; नेमका वाद काय?

भारतात स्पायडर-मॅनची जबरदस्त क्रेझ

भारतात हॉलीवूड चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे च्या विक्रमी कमाईवरून भारतीय प्रेक्षकांमध्ये या सुपरहिरो फ्रँचायझीची लोकप्रियता किती प्रचंड आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी कोणते विक्रम मोडतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news