IND vs PAK Asian Games Gold Medal: भारत - पाक 'सुवर्ण' सामना.. कधी अन् कुठं पाहायचा; पाऊस पडल्यास कोणाला मिळणार गोल्ड?

पावसाने सामना रद्द झाला तर गेल्या एशियन्स गेममध्ये रँकिंगच्या आधारावर पदक दिलं होतं मात्र यंदा तसं होणार नाही.
IND vs PAK Asian Games Gold Medal
IND vs PAK Asian Games Gold MedalPUDHARI
Published on: 
Updated on: 

IND vs PAK Asian Games Gold Medal: भारताने एशियन गेम्स २०२६ च्या पुरूषांच्या क्रिकेट सेमी फायनल सामन्यात श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर भारत आता सुवर्ण पदकाच्या अगदी जवळ पोहचला आहे. सुवर्ण पदकासाठी भारताचा मुकाबला आता पाकिस्तान सोबत होणार आहे.

IND vs PAK Asian Games Gold Medal
India vs Sri Lanka: इशान-वैभवचा धमाका.. टीम इंडिया सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर, लंकेचा उडवला धुव्वा

भारताने सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेचा डाव ४५ धावात गुंडाळत भारताने सामना १२४ धावांची जिंकला. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशीने ३८ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

IND vs PAK Asian Games Gold Medal
Asian Games IND vs PAK Hockey : पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघाची फायनलमध्ये धडक

कधी आहे 'सुवर्ण' सामना

आता शनिवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता भारत पाकिस्तान सुवर्ण पदकासाठी भिडणार आहेत तर त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बांगलादेश आणि श्रीलंका कास्य पदकासाठी भिडणार आहेत.

IND vs PAK Asian Games Gold Medal
Asian Games 2026 | भारताची एकाच दिवशी चार सुवर्णपदकांची लयलूट; सातार्‍याच्‍या साहिलचा दुहेरी ‘सुवर्ण’वेध!

कुठं पाहायचा?

एशियन गेम्सचे सर्व सामने हे सोनी स्पोर्ट्सवरून टेलिकास्ट होणार आहेत. तर तुम्हाला सामना ऑनलाईन पाहायचा असेल तर सोनी लिव्ह वर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.

IND vs PAK Asian Games Gold Medal
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताला आणखी एक सुवर्ण; मराठमोळ्या साहिलचा अचूक निशाणा, दक्षिण कोरियावर थरारक विजय

सामन्यात पाऊस आला तर?

जर सुवर्ण पदकाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर सुवर्ण पदक हे दोन्ही देशांना विभागून देण्यात येणार आहे. गेल्या एशियन्स गेम्समध्ये रँकिंगच्या आधारावर मेडल दिले गेले होते. मात्र यंदाच्या एशियन्स गेम्समध्ये नियम बदलण्यात आला असून मेडल विभागून देण्यात येणार आहे.

नियम जरी बदलला असला तरी दोन्ही सामन्यांसाठी हवामान चांगलं असल्याचा सध्याचा तरी अंदाज आहे. त्यामुळं सामना पूर्ण षटकांचा आणि रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news