India vs Sri Lanka: इशान-वैभवचा धमाका.. टीम इंडिया सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर, लंकेचा उडवला धुव्वा

श्रीलंकेचे निम्म्या फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाही.
India vs Sri Lanka Asian Games
India vs Sri Lanka Asian Gamespudhari
Published on: 
Updated on: 

India vs Sri Lanka Asian Games 2026: भारताने एशियन्स गेम्स २०२६ च्या पुरूष क्रिकेट सेमी फायनल सामन्यात श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली. आता भारत शनिवारी सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकात ७ बाद १६९ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला फक्त ४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून इशान किशनने धमाकेदार खेळी करत ८० धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशीने ३८ धावांचे योगदान दिलं होतं. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी चांगला मारा करत २ विकेट्स घेतल्या.

India vs Sri Lanka Asian Games
Asian Games 2026 | भारताची एकाच दिवशी चार सुवर्णपदकांची लयलूट; सातार्‍याच्‍या साहिलचा दुहेरी ‘सुवर्ण’वेध!

वैभव अन् इशानने तारलं

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारताला दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्माच्या रूपात पहिला धक्का दिला होता. त्यानंतर आलेला संजू सॅमसन देखील ७ धावांची भर घालून माघारी परतला होता.

त्यानंतर सलामीवीर वैभव सूर्यवंशीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने ६ षटकात संघाला ६० धावांच्या जवळ पोहचवले. मात्र तो देखील ३८ धावा करून मोठी खेळी न करता बाद झाला.

India vs Sri Lanka Asian Games
Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची फायनलमध्ये धडक! सुवर्णपदकासाठी २ ऑक्टोबरला चीनशी महामुकाबला

इशानचा धडाका

वैभव बाद झाल्यावर इशान किशनने भारताच्या फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेत धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ४६ चेंडूत नाबाद ८० धावा ठोकत भारताला १६९ धावांपर्यत मजल मारून दिली. इतर फलंदाजांना त्याला फारशी साथ देता आली नाही.

India vs Sri Lanka Asian Games
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताला आणखी एक सुवर्ण; मराठमोळ्या साहिलचा अचूक निशाणा, दक्षिण कोरियावर थरारक विजय

भारतानेच १६९ धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या श्रीलंकेचे भारतीय गोलंदाजांची चांगलेच कंबरडे मोडले. बुमराहने पहिल्या षटकातच्या दुसऱ्याच चेंडूवर सिनेथ जयवर्धानाला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर याच षटकात लंकेचा दुसरा सलामीवीर देखील शुन्यावरच धावबाद झाला.

इथून लंकेचा डाव काही सावरला नाहीच... लंकेकडून फक्त नुवांदू फर्नांडीस यालाच दुहेरी आकडा गाठता आला. त्याने १५ धावांचे योगदान दिले. भारताने श्रीलंकेला ४५ धावात गुंडाळत सामना खिशात टाकला. भारताकडून अक्षर पटेलने ८ धावात तर अभिषेक शर्माने २ धावात प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news