

west indies vs australia t20 series australia playing 11 for 1st t20 match
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघात अनेक प्रमुख खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत कांगारू संघाने यजमान संघाचा दारुण पराभव करत 3-0 ने मालिका जिंकली. वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत क्लीन स्वीप दिल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. हा सामना जमैका येथे भारतीय वेळेनुसार 21 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता खेळवला जाईल. कांगारू संघाचे नेतृत्व मिचेल मार्श सांभाळत असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार मार्श आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क डावाची सुरुवात करतील.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस फलंदाजी करण्याची शक्यता आहे, तर चौथ्या क्रमांकावर कॅमरून ग्रीन यांना संधी दिली जाऊ शकते. स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सामन्यातून मिचेल ओवेन टी-20 प्रकारात आपले पदार्पण करणार आहे. संघातील गोलंदाजीची धुरा कूपर कोलोनी, बेन डॉरिश, सीन ॲबॉट, नेथन एलिस आणि ॲडम झम्पा यांसारख्या खेळाडूंवर असेल.
मिचेल मार्श (कर्णधार), जॅक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, कूपर कोलोनी, बेन डॉरिश, सीन ॲबॉट, नेथन एलिस, ॲडम झम्पा.