IPL 2026 Winner Prediction| यंदा 'हा' संघ जिंकणार IPL ट्रॉफी! वीरेंद्र सहवागने थेट नावच सांगत वर्तवले भाकीत

Virender Sehwag IPL prediction 2026 | कोणते दोन संघ ठरतील प्रबळ यावरही केले भाष्‍य
IPL 2026 Winner
यंदा आयपीएल ट्रॉफी कोणता संघ जिंकणार यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भाकित केले आहे. Pudhari
Published on
Updated on

Virender Sehwag IPL prediction 2026

आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) उत्कृष्ट कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. तसेच कोणते दोन संघ बलाढ्य ठरतील, यावरही आपलं मत व्‍यक्‍त केले आहे.

'यावर्षीही ट्रॉफी आरसीबीचीच' : सेहवाग

'क्रिकबझ'च्या एका शोमध्ये या संघाच्या कामगिरीवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या ज्या पद्धतीने सलग सामने खेळत आहे आणि संघात जो समतोल दिसत आहे, ते पाहता हा संघ यावर्षीही ट्रॉफी सहज जिंकेल असेच वाटते. वीरेंद्र सेहवागने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू समोरील आव्हानांचाही उल्लेख केला आहे, पण आरसीबी यावर्षीही जेतेपदावर नाव कोरू शकते, असा विश्‍वासही व्‍यक्‍त केला आहे.

IPL 2026 Winner
IPL 2026 Playoffs Equation | KKR च्या विजयामुळे CSK आणि RR च्या टॉप-४ मधील अडचणी वाढल्या; जाणून घ्या प्लेऑफचे संपूर्ण समीकरण

आरसीबीला टक्कर देणारा संघ म्हणजे गुजरात टायटन्स

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या ज्या पद्धतीने खेळत आहेत, ते पाहता यावर्षीही ट्रॉफी त्यांचीच (RCB) आहे असे वाटते. आरसीबीला टक्कर देणारा संघ म्हणजे 'जीटी' (गुजरात टायटन्स). जर त्यांनीही टॉप-२ मध्ये फिनिश केले, तर आरसीबीसाठी अडचण निर्माण होईल; कारण गुजरात टायटन्सचे गोलंदाजी युनिट देखील उत्कृष्ट आहे. या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये भिडताना पाहणे रंजक ठरेल, कारण त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत आहे. त्यांचे टॉप-३ फलंदाज सातत्याने धावा करत आहेत. अहमदाबादच्या मैदानावर जर या संघाचे टॉप-३ फलंदाज चालले, तर ते सामना तिथेच संपवून टाकतात, असेही सेहवान याने सांगितले.

IPL 2026 Winner
IPL 2026 | 'डिअर क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' : करुण नायरची 'ती' जुनी पोस्ट का होतीय व्हायरल?

आरसीबी ठरला प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा पहिला संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबी या हंगामात प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे.

IPL 2026 Winner
Hardik Pandya | "हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही"; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आतापर्यंत १३ पैकी ९ सामने जिंकले

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या हंगामात आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ९ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकूण १८ गुणांसह हा संघ क्वालिफाय झाला आहे. विशेष म्हणजे, आरसीबीचा अजून एक सामना बाकी आहे.

IPL 2026 Winner
Sakib Hussain | 72 चेंडूत एकही षटकार नाही! IPL मध्ये 'या' गोलंदाजाचा 'दरारा', टीम इंडियाला मिळाला आणखी एक 'बुमराह'?

२०२५ चा फॉर्म ठेवलाय कायम

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने वर्ष २०२५ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. संघाने यावर्षीहीआपला हाच फॉर्म या हंगामातही कायम ठेवला आहे. आरसीबीचे सर्व खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असून, प्लेऑफदरम्यान सलामीवीर फिल सॉल्ट देखील संघात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिल सॉल्टच्या येण्याने संघाची सलामीची कमकुवत बाजू दूर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news