IPL 2026 Playoffs Equation | KKR च्या विजयामुळे CSK आणि RR च्या टॉप-४ मधील अडचणी वाढल्या; जाणून घ्या प्लेऑफचे संपूर्ण समीकरण

IPL 2026 Playoffs Equation | केकेआरने दबावाखालील केली उत्‍कृष्‍ट कामगिरी
IPL 2026 Playoffs Equation
प्रतिकात्‍मक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

IPL 2026 Playoffs Equation

IPL 2026 प्लेऑफचे चित्र प्रत्येक सामन्यानुसार बदलताना दिसत आहे. शनिवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) स्थिती 'करो या मरो' अशी झाली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील या संघासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी उरली होती आणि गुजरात टायटन्सविरुद्धचा पराभव त्यांच्या या हंगामातील प्रवासाचा शेवट करू शकला असता. मात्र, केकेआरने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी करत गुजरातचा २९ धावांनी पराभव तर केलाच, शिवाय प्लेऑफच्या शर्यतीत एक नवा ट्विस्ट आणला. या सामन्यापूर्वी केकेआरची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता केवळ ३.६ टक्के होती, आता वाढून ७.१ टक्के झाली आहे.

आरसीबी, गुजरात टायटन्‍सचे प्लेऑफमधील स्‍थान पक्‍के

या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) नेट रनरेट चांगला असला, तरी सलग विजयांमुळे गुजरातकडे आघाडी होती. मात्र, गुजरातच्या पराभवानंतर आता आरसीबीची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ९६.५ टक्के झाली आहे, तर गुजरात ९६ टक्क्यांवर घसरला आहे. असे असले तरी हे दोन्ही संघ पुढील फेरीत आपली जागा जवळपास पक्की करून बसले आहेत.

IPL 2026 Playoffs Equation
IPL 2026 : ऋतुराज, बुमराह, सूर्या अन् रिंकू... ज्यांच्या जीवावर मारत होते उड्या; त्याच 'दिग्गजांनी' संघांना पोहचवलं रसा तळाला
Pudhari

सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढली

आता खरी आणि सर्वात मनोरंजक लढत ही उर्वरित दोन जागांसाठी आहे. सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता ७०.३ टक्क्यांवरून वाढून ७०.८ टक्के झाली आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्सला केकेआरच्या या विजयामुळे किरकोळ फटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सची शक्यता ३.१ टक्क्यांवर स्थिर आहे, तर केकेआरने स्वतःला सातव्या स्थानावर पोहोचवून नव्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

IPL 2026 Playoffs Equation
Sunil Gavaskar | 'शतकासाठी स्वार्थी व्हावे लागले असते'; संजू सॅमसनच्या रिॲक्‍शनवर सुनील गावस्‍कर म्‍हणाले, "संयम नेहमीच.."

बदललेले समीकरण, प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संघाची टक्‍केवारी

  • राजस्थान रॉयल्स: ५१.६% वरून ५१.२%

  • पंजाब किंग्स: ४८.८% वरून ४७.४%

  • चेन्नई सुपर किंग्स: २८.४% वरून २८%

IPL 2026 Playoffs Equation
IPL 2026 | 'डिअर क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' : करुण नायरची 'ती' जुनी पोस्ट का होतीय व्हायरल?

केकेआरने केली दडपण झुगारत उत्‍कृष्‍ट कामगिरी

टॉस गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. फिन ॲलनने धुवांधार फलंदाजी करत ९३ धावा ठोकल्या आणि गुजरातच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव राखला. त्याच्या जोडीला अंगकृष रघुवंशीने नाबाद ८२ धावांची शानदार खेळी केली, तर कॅमेरॉन ग्रीननेही ५२ धावांचे योगदान देत संघाला विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले. या तिन्ही फलंदाजांच्या जोरावर केकेआरने २० षटकांत २४७ धावांचा डोंगर उभारला. या हंगामातील संघाची सर्वोच्च धावसंख्‍या ठरली. ईडन गार्डन्सवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. गुजरातचे जवळपास सर्वच गोलंदाज हतबल दिसले.

IPL 2026 Playoffs Equation
Jasprit Bumrah IPL 2026 |बुमराहच्या यॉर्करची ‘धार’ कुठे हरवली? वर्ल्ड कप गाजवल्यानंतर IPLमध्ये का ठरतोय हतबल?

कर्णधार गिलची खेळीही गुजरातला वाचवू शकली नाही

२४८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनेही दमदार सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत ४९ चेंडूत ८५ धावा केल्या. सामन्यातील चुरस शेवटपर्यंत कायम ठेवली. परंतु, दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळू शकली नाही. आवश्यक रनरेट सातत्याने वाढत गेला आणि शेवटी गुजरातचा संघ २० षटकांत २१८/४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

IPL 2026 Playoffs Equation
sunil gavaskar on shreyas iyer | "श्रेयसने खेळपट्टीवर.." : पंजाब किंग्सच्‍या सलग ५ पराभवांनंतर सुनील गावस्करांनी सुनावले

केकेआरचा मार्ग खडतर

केकेआरचा पुढील मार्ग खडतर आहे. संघाला केवळ आपले उर्वरित सामने जिंकावेच लागणार नाहीत, तर इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. तरीही, गुजरातसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळालेल्या या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. २४ मे पर्यंत होणारे लीग सामने फ्‍ले ऑफमधील चार संघ निश्‍चित करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news