Virat Kohli Video: ‘एक दिवस हे सगळं संपणार...’ शतकानंतर विराट कोहलीचं भावूक वक्तव्य, चाहते चिंतेत

Virat Kohli Statement: KKR विरुद्ध नाबाद १०५ धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीने “एक दिवस हे सगळं संपणार आहे” असं भावूक वक्तव्य केलं. तो म्हणाला की, क्रिकेटमधील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे.
Virat Kohli Statement
Virat Kohli StatementPudhari
Published on
Updated on

Virat Kohli Statement: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या शानदार खेळीमुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी त्याचे एक भावूक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर विराटने केलेल्या एका वक्तव्यामुळे चाहते भावूक झाले आहेत.

बुधवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद १०५ धावांची दमदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. Royal Challengers Bengaluru (RCB) ने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या शानदार कामगिरीसाठी विराटला ‘Player of the Match’ पुरस्कारही देण्यात आला.

मात्र सामन्यानंतर विराटने केलेलं वक्तव्य अनेकांना विचार करायला भाग पाडणारं ठरलं. तो म्हणाला, “एक दिवस हे सगळं संपणार आहे.” या विधानामुळे अनेक चाहत्यांना विराट निवृत्तीबाबत संकेत देतोय का, असा प्रश्न पडला. मात्र विराटचा अर्थ भविष्यात क्रिकेटमधून पूर्ण निवृत्त होण्याशी संबंधित होता.

विराटने स्पष्ट केलं की, एक दिवस असा येईल जेव्हा तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेला असेल. त्यामुळे मैदानावर जोपर्यंत संधी मिळते, तोपर्यंत प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे. “मी मैदानावर माझं सर्वस्व देतो, कारण एक दिवस हे सगळं संपणार आहे,” असं विराटने भावूक होत सांगितलं.

विशेष म्हणजे, या शतकापूर्वी विराट सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. टी-२० क्रिकेटमध्ये अशी वेळ त्याच्या कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदाच आली होती. त्यामुळे त्याच्यावर दबाव असल्याची चर्चा सुरू होती. याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “मी रन करू शकत नव्हतो, ही गोष्ट मला आतून खूप त्रास देत होती. कारण माझ्या खेळात काही कमतरता नव्हती. त्यामुळे मनात अस्वस्थता होती.”

तरीही त्याने स्पष्ट केलं की, शतकापेक्षा संघासाठी सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. “शतक झालं किंवा नाही, पण सामना जिंकणं सर्वात महत्त्वाचं असतं,” असं तो म्हणाला.

Virat Kohli Statement
RCB vs KKR | विराट कोहलीचे झंझावाती शतक; धमाकेदार विजयासह आरसीबी टॉपवर

दबावाबद्दल विचारलं असता विराटने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. “लोक म्हणतात दबाव ही एक संधी असते आणि त्यामागे कारण आहे. दबाव तुम्हाला जमिनीवर ठेवतो आणि तुमचा खेळ आणखी सुधारतो,” असं त्याने म्हटलं. काही सामने आपल्या मनासारखे झाले नाहीत, तर घाबरायला होतं, पण तीच गोष्ट आपल्याला अधिक मेहनत घ्यायला भाग पाडते, असंही तो म्हणाला.

या शतकासह विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. मात्र विक्रमांबाबत बोलताना विराटने नम्र भूमिका घेतली. “मला फक्त बॅटिंग करायला आवडतं. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळणं हेच माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,” असं त्याने सांगितलं.

Virat Kohli Statement
ICC Test rankings | आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह अव्वल स्थानी कायम

सध्या विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. मात्र त्याच्या “एक दिवस हे सगळं संपणार आहे” या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा भावनिक चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news