IPL 2026 Playoff Scenarios| गुजरातचे स्‍थान पक्‍के! जाणून घ्या 'प्ले-ऑफ'च्या शर्यतीत कोणत्या संघाला किती टक्के संधी?

लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स (MI) स्पर्धेतून बाहेर
IPL 2026 Points Table
IPL 2026 Playoff ScenariosPudhari
Published on
Updated on

IPL 2026 Playoff Scenarios

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा थरार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील ५६ सामने मंगळवार, १२ मे पर्यंत पार पडले आहेत. आता केवळ १४ लीग सामने शिल्लक आहेत. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) स्पर्धेतून बाहेर पडले असून दिल्ली कॅपिटल्स (DC) चे अस्तित्वही धोक्यात आले आहे. गुजरात टायटन्स (GT) ने प्ले-ऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. IPL 2026 चा ५६ वा लीग सामना १२ मे रोजी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. १६ गुणांसह गुजरातचा संघ आरामात प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकतो. टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या संघाकडे किती टक्के संधी आहे, हे जाणून घेऊया.

कोणत्या संघाची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची किती टक्के संधी?

गुजरातचे स्थान पक्के

गुजरात टायटन्स (GT): गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आता ९९.६ टक्के झाली आहे. गुजरातच्या खात्यात १६ गुण असून त्यांचे दोन सामने अद्याप बाकी आहेत. तसेच, टॉप-२ मध्ये राहण्याची त्यांची संधी ८४.५ टक्के आहे.

IPL 2026 Points Table
Hardik Pandya | "हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही"; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

आरसीबीला टॉप-२ मध्ये जाण्याची संधी ५९ टक्के

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या प्ले-ऑफची संधी ८८.१ टक्के आहे, तर टॉप-२ मध्ये 'फिनिश' करण्याची संधी ५९ टक्के आहे.

सनरायझर्स हैदराबाद टॉप-२ मध्ये जाण्याची शक्यता ३५.५ टक्के

सनरायझर्स हैदराबाद (SRH): गुजरातकडून मिळालेल्या पराभवामुळे हैदराबादच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची प्ले-ऑफची संधी ८० टक्क्यांवरून घसरून ७६.८ टक्के झाली आहे. टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता ३५.५ टक्के आहे.

IPL 2026 Points Table
IPL 2026 : ऋतुराज, बुमराह, सूर्या अन् रिंकू... ज्यांच्या जीवावर मारत होते उड्या; त्याच 'दिग्गजांनी' संघांना पोहचवलं रसा तळाला

पंजाबची संधी किंचित वाढली

पंजाब किंग्स (PBKS): पंजाबचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांची संधी किंचित वाढली आहे. गुजरात-हैदराबाद सामन्यापूर्वी त्यांची संधी ६२.५ टक्के होती, ती आता ६४.५ टक्के झाली आहे. टॉप-२ साठी त्यांची २८.८ टक्के शक्यता आहे.

IPL 2026 Points Table
IPL 2026 | 'माझ्याकडे उत्तरं नाहीत... कोणतंही कारण नाही': लखनौच्या पराभवाच्या 'चौकारा'नंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला?

चेन्नईचा संघही शर्यतीत कायम

चेन्नई सुपर किंग्स (CSK): पाचव्या क्रमांकावर असलेला चेन्नईचा संघही शर्यतीत आहे. सीएसकेची टॉप-४ मध्ये जाण्याची संधी ५३.९ टक्के आहे, तर टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता २२ टक्के आहे.

IPL 2026 Points Table
Jasprit Bumrah IPL 2026 |बुमराहच्या यॉर्करची ‘धार’ कुठे हरवली? वर्ल्ड कप गाजवल्यानंतर IPLमध्ये का ठरतोय हतबल?

राजस्थान रॉयल्सची टॉप-४ मध्ये पोहोचण्याची संधी ५३.८ टक्के

राजस्थान रॉयल्स (RR): राजस्थानची टॉप-४ मध्ये पोहोचण्याची संधी ५३.८ टक्के असून टॉप-२ साठी त्यांच्याकडे १८.२ टक्के संधी आहे.

IPL 2026 Points Table
Vaibhav Suryavanshi IPL 2026 | "त्याला थांबवणे अशक्य!" : वैभव सूर्यवंशीबाबत गावस्करांनी सर्व IPL संघांना कोणता इशारा दिला?

कोलकाताला, दिल्ली संघाला संधी

कोलकाता नाईट रायडर्स (KKR): केकेआर अजूनही शर्यतीत असून त्यांच्या प्ले-ऑफची संधी १२.८ टक्के आहे, मात्र टॉप-२ मध्ये जाण्याची शक्यता केवळ ३.६ टक्के आहे. दिल्ली जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकते. तरीही त्यांची टॉप-४ मध्ये जाण्याची शक्यता केवळ १ टक्का उरली आहे. दिल्लीचा संघ जास्तीत जास्त तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकतो; टॉप-२ मध्ये जाण्याची त्यांची संधी आता संपुष्टात आली आहे.

IPL 2026 Points Table
IPL 2026 | "तुझं रोहित शर्मासोबत काही बिनसलंय का?" 'हिटमॅन'कडे दुर्लक्ष केल्याच्या प्रश्नावर आर. अश्विनने दिले मजेशीर उत्तर

लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स (MI) स्पर्धेतून बाहेर

मुंबई इंडियन्स (MI): ११ पैकी केवळ ३ सामने जिंकल्यामुळे मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स (LSG): लखनऊचा संघही आता टॉप-४ मध्ये जाऊ शकणार नाही. त्यांनी ११ पैकी ८ सामने गमावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news