Virat Shubman Viral Video: '...आणि विराटने शुभमनची दाढी ओढली!' मस्करीचा व्हिडिओ व्हायरल

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
IPL 2026 Virat Kohli Shubman Gill funny video
IPL 2026 Virat Kohli Shubman Gill funny videofile photo
Published on
Updated on

IPL 2026 Virat Kohli Shubman Gill Viral Video

धर्मशाळा: धर्मशाळा येथे आज होणाऱ्या आयपीएलच्या 'क्वालिफायर १' सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विराटने शुभमनला मिठी मारली आणि नंतर चिडवत त्याची दाढी आणि गाल ओढल्याचे दिसत आहे.

धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियमवर आज होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करत होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आरसीबीचा उपकर्णधार जितेश शर्मासोबत बोलताना दिसतोय. तितक्यात तिथे खांद्याला काळी बॅग अडकवून विराट कोहलीची एन्ट्री होते. विराटला पाहताच शुभमन आदराने त्याच्याकडे जातो आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या खोडकर अंदाजात विराट थेट शुभमनच्या दाढीवरून हात फिरवत त्याचे गाल ओढताना दिसतो.

IPL 2026 Virat Kohli Shubman Gill funny video
Travis Head: विराट कोहलीसोबत वाद! ट्रेविस हेडच्या कुटुंबाला शिवीगाळ? पत्नी जेसिकाचा संताप; नेमकं काय घडलं?

आज होणाऱ्या सामन्यात केवळ दोन संघांमध्येच नाही, तर धावांच्या शर्यतीतही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या हंगामात विराटने १४ सामन्यांत ५५७ धावा केल्या असून यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, शुबमन गिल ६१६ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अव्वल स्थानी गुजरातचाच साई सुदर्शन (६३८ धावा) आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरलेले चारही संघ आता निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी यापूर्वीच पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले होते; तर, रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत राजस्थान रॉयल्सने अंतिम चार संघांमध्ये प्रवेश मिळवला.

IPL 2026 Virat Kohli Shubman Gill funny video
Cricketer death: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका; माजी रणजीपटूने मैदानावरच घेतला अखेरचा श्वास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news