Virat Kohli Avneet Kaur : कोहलीच्या ‘फोटो लाईक’ वादानंतर अवनीत कौरला लागली लॉटरी! इंस्टा पोस्टच्या दरात 30 टक्के वाढ

अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर चर्चेत आहे. विराट कोहलीच्या एका चुकीमुळे अवनीतला मोठा फायदा झाला आहे.
avneet kaur virat kohli instagram
Published on
Updated on

virat kohli photo like avneet kaur net worth hike to rs 43 crore

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकतेच अभिनेत्री अवनीत कौरच्या इंस्टाग्रामवरील फोटोला लाईक करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून कोहलीला स्पष्टीकरण द्यावे लागले. कोहलीने हे प्रकरण मिटवले असले तरी, याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा अवनीत कौरला झाला आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम रंगात आला आहे. आरसीबीसाठी विराट कोहलीची बॅट तळपत आहे. तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने पुन्हा एकदा 500 धावांचा टप्पा पार केला आहे. अभिनेत्री अवनीत कौरने 30 एप्रिल रोजी तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेक फोटो शेअर केले. यामध्ये ती शॉर्ट स्कर्टसह हिरव्या रंगाचा टॉप घातलेली दिसत आहे. तिचे फोटो अनेकांना आवडले. पण जेव्हा विराट कोहलीने हा फोटो लाईक केल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला. कारण अनुष्का शर्माचा वाढदिवस 1 मे रोजी होता. त्याच दिवशी विराटकडून अवनीत कौरचा फोटो लाईक झाला, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेक मीम्सचा व्हायरल झाले.

avneet kaur virat kohli instagram
अनुष्काच्या बर्थडेला कोहलीने इन्स्टाग्रामवर ‘Like’ केलेली अवनीत कौर आहे कोण?

काही नेटक-यांनी हा ‘लाईक’ जाणूनबुजून केल्याचा आरोप केला. त्याचवेळी, काहींनी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला टॅग करून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण इतके गंभीर झाले की कोहलीला स्वतः स्पष्टीकरण द्यावे लागले.

कोहलीचे स्पष्टीकरण

कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टोरी पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने स्पष्टीकरण दिले की, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझ्याकडून तो फोटो जाणूनबुजून लाईक केला झालेला नाही. हे चुकून घडले आहे. मी सर्वांना विनंती करतो की याबद्दल कोणताही चुकीचा समज करू नका. हे कदाचित इंस्टाग्रामच्या अल्गोरिथममुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे घडले असेल. माझा दृष्टिकोन समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.’

avneet kaur virat kohli instagram
Virat Kohli like Avneet Kaur Photo : अवनीत कौरच्या फोटोला लाईक करणे विराटला पडले महागात! ट्रोल होताच नेटक-यांना द्यावे लागले स्पष्टीकरण

2 मिलियन फॉलोअर्सचा फायदा

दरम्यान, हा वाद अवनीत कौरसाठी एक सुवर्णसंधी बनला आहे. तिच्या चाहत्यावर्गात प्रचंड वाढ झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, कोहलीच्या ‘इन्स्टा लाईक’ प्रकरणापूर्वी अवनीतचे इंस्टाग्रामवर सुमारे 30 मिलियन फॉलोअर्स होते. पण त्यानंतर इन्स्टा फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या 31.8 पर्यंत पोहचली आहे.

सोशल मीडिया तज्ज्ञांच्या मते, अशा वादांमुळे टीकेची लाट उसळली असली तरी, प्रसिद्धीच्या बाबतीत त्याचा सेलिब्रिटींना फायदा होतो. 23 वर्षीय अवनीत कौरला देखील लॉटरी लागली आहे. आता टॉप ब्रँड्स आणि जाहिरात एजन्सीज अवनीत कौरसोबत कोलॅबोरेशनसाठी सक्रियपणे संपर्क साधत आहेत.

avneet kaur virat kohli instagram
Virat Kohli Brother Vikas vs Sanjay Manjrekar : ‘स्वत:चा स्ट्राईक रेट 64 आणि 200+ च्या बाता मारताय’, विराटच्या भावाचे संजय मांजरेकरांना सडेतोड प्रत्युत्तर

अवनीतच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठीच्या दरात 30 टक्के वाढ झाली आहे. तिची एकूण संपत्ती सध्या सुमारे 43 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही काळात ती अंदाजे 5 कोटी रुपयांनी वाढली आहे.

फक्त 23 व्या वर्षीच, अवनीत कौर ऑनलाईन प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झाली आहे. इन्स्टाग्राम अल्गोरिदम्स आणि व्हायरल कंटेंटच्या युगात, एक साधा ‘लाईक’ एखाद्या युजर्सचे आयुष्य बदलून टाकतो हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

avneet kaur virat kohli instagram
IPL इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news