

Virat Kohli like Avneet Kaur Photo
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात एखादी छोटीशी घटनाही मोठी बातमी बनते. यात आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतही असेच काहीसे घडले आहे. अलिकडेच, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवनीत कौरचा एक फोटो कोहलीच्या इंस्टाग्रामवरून 'लाइक' दिसल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. यावर नेटक-यांनी लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि अनेक प्रकारचे अंदाज बांधले जाऊ लागले.
हे प्रकरण इतके गंभीर झाले की विराट कोहलीला स्वतः पुढे येऊन त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन जारी केले की त्याला अवनीत कौरची पोस्ट जाणूनबुजून लाईक केलेली नाही.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्याने स्पष्टीकरण दिले की, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझ्याकडून तो फोटो जाणूनबुजून लाईक केला झालेला नाही. हे चुकून घडले आहे. मी सर्वांना विनंती करतो की याबद्दल कोणताही चुकीचा समज करू नका. हे कदाचित इंस्टाग्रामच्या अल्गोरिथममुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे घडले असेल. माझा दृष्टिकोन समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.’
अभिनेत्री अवनीत कौरने 30 एप्रिल रोजी तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेक फोटो शेअर केले. यामध्ये ती शॉर्ट स्कर्टसह हिरव्या रंगाचा टॉप घातलेली दिसत आहे. तिचे फोटो अनेकांना आवडले. पण जेव्हा विराट कोहलीने हा फोटो लाईक केल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला. कारण अनुष्का शर्माचा वाढदिवस 1 मे रोजी होता. त्याच दिवशी विराटकडून अवनीत कौरचा फोटो लाईक झाला, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावे लागले.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. त्यांनी नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना प्रभावित केले आहे.