Virat Kohli: विराट कोहलीची सुवर्णभरारी! अंडर-१९ पासून आयपीएल २०२६ पर्यंत जिंकलेल्या सर्व प्रमुख ट्रॉफींची यादी

Virat Kohli
Virat Kohlipudhari
Published on
Updated on

Virat Kohli all trophies list 2026: भारतीय क्रिकेट विश्वातील महान फलंदाज विराट कोहली याने आपल्या अफाट कौशल्याच्या आणि सातत्याच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे. देशांतर्गत क्रिकेट, अंडर-१९, आंतरराष्ट्रीय क्रिकेट ते थेट आयपीएल (IPL) पर्यंत विराट कोहलीने अनेक ऐतिहासिक ट्रॉफींवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या कारकिर्दीतील या सुवर्ण प्रवासाची आणि त्याने जिंकलेल्या प्रमुख ट्रॉफींची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

Virat Kohli
Virat Kohli IPL Final Record | विराट कोहली पाचव्‍यांदा खेळणार विजेतेपदाचा सामना; IPL फायनलमधील रेकॉर्ड कसा आहे?

अंडर-१९ आणि सुरुवातीचे यश:

  • २००५-०६: विजय मर्चंट ट्रॉफी (Vijay Merchant Trophy)

  • २००७: अंडर-१९ इन्व्हिटेशनल दुसरी त्रिकोणी मालिका (U19 Invitational 2nd Tri-Series)

  • २००७: अंडर-१९ त्रिकोणी मालिका, श्रीलंका (U19 Tri-Series Sri Lanka)

  • २००८: अंडर-१९ त्रिकोणी मालिका, दक्षिण आफ्रिका - कर्णधार म्हणून [C]

  • २००८: अंडर-१९ ओडीआय वर्ल्ड कप - कर्णधार म्हणून [C] (या विजयाने विराटला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली)

Virat Kohli
IPL 2026 Final | अहमदाबादमध्ये IPLफायनल सामन्‍यात पावसाने खोडा घातल्यास काय होणार? जाणून घ्या 'रिझर्व्ह डे'चा नियम

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरुवातीचा दबदबा:

  • २००८: एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी (NKP Salve Challenger Trophy)

  • २००९: कॉम्पॅक कप (Compaq Cup)

  • २०१०: आशिया कप (Asia Cup)

  • २०१०: देवधर ट्रॉफी - कर्णधार म्हणून [C]

  • २०१०: इराणी कप (Irani Cup)

Virat Kohli
IPL 2026 Final: RCB ने जिंकले सलग दुसरे विजेतेपद; फायनलमध्ये कोहलीचा 'विराट' शो, गुजरातचा दारुण पराभव

आयसीसी (ICC) स्पर्धांमधील ऐतिहासिक विजय:

  • २०११: आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप (धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेला ऐतिहासिक विश्वचषक)

  • २०१३: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy)

  • २०१३: वेस्ट इंडिज त्रिकोणी मालिका (West Indies Tri-Nation Series)

  • २०१६: आशिया कप टी-२० (Asia Cup T20)

Virat Kohli
Virat Kohli Viral Video: विराटचा विजयी षटकार आणि अनुष्कासाठी खास ‘फ्लाइंग किस’; रोमँटिक क्षण झाला व्हायरल

कारकिर्दीतील सुवर्णकाळ (२०२३ ते २०२६):

  • २०२३: आशिया कप

  • २०२४: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप (टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचा अखेरचा ऐतिहासिक सामना)

  • २०२५: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy)

  • २०२५: आयपीएल विजेतेपद (IPL) (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पहिले विजेतेपद)

  • २०२६: आयपीएल विजेतेपद (IPL) (आरसीबीचे सलग दुसरे ऐतिहासिक विजेतेपद)

Virat Kohli
RCB IPL 2026: एबी डिव्हिलियर्स, विजय मल्ल्या ते सचिन तेंडूलकर यांच्या पोस्ट व्हायरल; RCB विजयानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ

विराट कोहलीने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये विजेतेपद पटकावून स्वतःला एक 'अल्टिमेट चॅम्पियन' सिद्ध केले आहे. अंडर-१९ चा कर्णधार ते आयपीएल २०२६ मधील आरसीबीचा सलग दुसरा विजय, हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news