

Virat Anushka Celebration Video: रॉयल चॅलेंजर बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर संपूर्ण संघ जल्लोषात बुडाला आहे. मात्र सगळ्या संघाचे सेलिब्रेशन एकीकडे आणि विराट कोहली, अनुष्का शर्माचे सेलिब्रेशन एकीकडे अशी स्थिती आहे. फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा त्याला रन चेसचा मास्टर का म्हणतात हे दाखवून दिलं. त्याने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा करत आरसीबीच्या फायनल विजयात मोलाचा वाटा उचलला.
आरसीबी आता आयपीएल इतिहासातील पाठोपाठ दोन विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज याच्यानंतरचा तिसरा संघ ठरला आहे. या विजेतेपदानंतर आरसीबी संघाने तुफान जल्लोष केला. या जल्लोषाचे केंद्रबिंदू विराटच राहिला. त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत जोरदार सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनवेळी विराट कोहलीने एक खास लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भन्नाट डान्स देखील करत होते. विराटने जो खास टी-शर्ट घातला होता त्यावर, 'एकदा चांगलं वाटलं म्हणून दुसऱ्यांदा केलं.... (One felt nice, we did it twice) असं लिहिलं होतं. तर पुढच्या बाजूला चॅम्पियन्स असं गोल्डन अक्षरात लिहिलं होतं.
या व्हिडिओत विराट कोहली, अनुष्का शर्मा डान्स करत असताना आणि त्यांच्या जोडीला माजी RCB खेळाडू आणि सध्याच्या बॅटिंग कोच दिनेश कार्तिक देखील डान्स करताना दिसत आहे.
दरम्यन, विराट कोहली विजेतेपदानंतर बोलताना म्हणाला की, 'आम्हाला यासाठी खूप काळ वाट पहावी लागली आहे. त्यानंतर आम्हाला आता खेळाडूंचा असा एक ग्रुप मिळाला आहे ज्याच्यामुळे तुम्ही मैदानावर आल्यावर तुम्हीच फक्त लढताय असं फिलिंग येऊ देत नाही. तुमच्या अवती भोवती जे खेळाडू आहेत ते तुम्हाला सामना जिंकून देत आहेत. आमच्या संघात अनेकांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
'तुम्ही पाहू शकता आमच्याकडे जॉस हेजलवूड, भूवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि कृणाल पांड्यासारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. तुम्ही रिसकला देखील त्यांच्या तोडीचा समजू शकता. त्याच्यासाठी हा सीजन चांगला गेला आहे.' असे देखील विराट म्हणाला.
मी अनेकाना म्हणालो देखील आहे की गेल्यावर्षीसारखा दबाव आता जाणवत नाही. आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे कोणत्या क्षमतेचा ग्रुप आहे.'