

Vaibhav Sooryavanshi Records: भारताचा लिटिल वंडर बॉय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. त्याने रायझिंग स्टार आशिया कपमधील युएईविरूद्धच्या सामन्यात फलंदाजीतील हिंसाचार कसा असतो तो दाखवून दिला. वैभव सूर्यवंशीने एकाच सामन्यात अनेक विक्रम पाठोपाठ मोडले. एवढंच काय तर एक बातमी पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरा विक्रम पायदळी तुडवत त्याने सर्वच पत्रकारांची दमछाक केली.
वैभव सूर्यवंशीने १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर अवघ्या २८ चेंडूत शतकी मजल मारली. हे शतक लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठरले. या शतकाचा आनंद सेलिब्रेट होत असतानाच त्याने ४० दिडशतकी मजल मारत सर्वात वेगवान दीडशतकी मजल मारली. त्यानंतर श्वास घेतो न घेतो तोच ५२ चेंडूत द्विशतक ठोकत वैभवने सर्वांनाच थक्क केलं.
एवढंच काय तर एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्यातही त्याने अव्वल नंबर पटकावला. त्याने २८ चेंडूत हा कारनामा करून सामना १५ षटकात संपवला. भारताने वैभवच्या २०४ धावांच्या खेळीच्या जोरावर युएईचे २४९ धावांचे आव्हान १४.३ षटकात पार केले. भारताकडून रिंकू सिंहने नाबाद २७ धावा करत वैभवला साथ दिली. अभिषेक शर्मा १२ धावा करून बाद झाला होता.
लिस्ट-ए (List A) एकदिवसीय क्रिकेट शतकातील सर्वाधिक स्ट्राईक रेट
३८४.९० – वैभव सूर्यवंशी, भारत अ विरुद्ध युएई २०२६ (५३ चेंडूंत २०४ धावा)
३३८.६३ – एबी डिव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग २०१५ (४४ चेंडूंत १४९ धावा)
३२८.९४ – जेक फ्रेझर-मॅकगर्क, दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध तस्मानिया, अॅडलेड २०२३ (३८ चेंडूंत १२५ धावा)
लिस्ट-ए (List A) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतके (चेंडूंनुसार)
५२ चेंडू – वैभव सूर्यवंशी, भारत अ विरुद्ध युएई २०२६
१०३ चेंडू – चॅड बोवेस, कॅन्टरबरी विरुद्ध ओटागो, ख्राईस्टचर्च २०२४
११४ चेंडू – एन. जगदीसन, तमिळनाडू विरुद्ध अरुणाचल, बेंगळुरू २०२२
११४ चेंडू – हॅरी ब्रूक, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी २०२६
सर्व व्यावसायिक क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक षटकार
२८ षटकार – वैभव सूर्यवंशी, भारत अ विरुद्ध युएई २०२६
२६ षटकार – तन्मय अग्रवाल, हैदराबाद विरुद्ध अरुणाचल, हैदराबाद २०२४ (रणजी ट्रॉफी)
२३ षटकार – कॉलिन मुनरो, ऑकलंड विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स, नेपियर २०१५ (प्लंकट शील्ड)
२३ षटकार – डार्सी शॉर्ट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वीन्सलँड, सिडनी २०१८ (वन डे कप)