Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या नावावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'च्या नवीन हंगामासाठी मैदानात उतरताच केली नवीन विक्रमाची नोंद
Vaibhav Sooryavanshi
Vaibhav SooryavanshiPudhari
Published on: 
Updated on: 

Vaibhav Sooryavanshi youngest T20 captain : भारतातील देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'च्या नवीन हंगामाला आज (दि. १४) पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत १५ वर्षीय 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीसाठी ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. आज मैदानात उतरणारच त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वैभव ठरला T20 क्रिकेटच्या इतिहासातील 'सर्वात तरुण' कर्णधार

'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'साठी बिहार संघाचा कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीची नियुक्ती करण्यात आली आहे. आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर त्याचा संघ सौराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरला आहे. बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. होळकर स्टेडियमवर नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे; तो टी-२० क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, त्याने अधिकृतपणे एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi : 'माझे काम सर्वांना खूश करणे नाही'.... वैभव सूर्यवंशीबाबत मुख्‍य प्रशिक्षक गौतम गंभीर काय म्‍हणाले?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतली दखल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) देशांतर्गत क्रिकेट विभागाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कामगिरीची दखल घेतली आहे. 'एक्स' वर नाणेफेकीची माहिती देताना बीसीसीआयने म्हटले आहे: "बिहारने नाणेफेक जिंकून सौराष्ट्रविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी, वैभव सूर्यवंशी पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे."

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi NZ vs IND: संधी दिली मात्र वाया गेली... ना चौकार ना षटकार; वैभव १.२ षटकातच पॅव्हेलियनमध्ये

याआधी कोणाच्या नावावर होता हा विक्रम?

याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम क्रोएशियाच्या झॅक वुकुसिकच्या नावावर होता. त्याने ७ ऑगस्ट २०२५ रोजी सायप्रस विरुद्धच्या सामन्यात १७ वर्षे ३११ दिवस वय असताना आपल्या संघाचे नेतृत्व केले होते.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीबाबत कॅप्टन श्रेयस अय्यरचं 'ते' एक वाक्य... अन् क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण!

वैभवचे यापूर्वीचे विक्रम

मागील दोन वर्षे भारतीय क्रिकेट वर्तुळाच्या विश्वात चर्चेत राहिलेला भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे, तसेच भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

Vaibhav Sooryavanshi
Samson vs Vaibhav Sooryavanshi : ‘वैभव सूर्यवंशीला वगळा, सॅमसनला संधी द्या’; भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी रहाणेचे मोठे विधान

आयपीएलमध्येही धडाकेबाज कामगिरी

वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही अनेक महत्त्वाचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याच्या दिमाखदार कारकिर्दीचा प्रारंभ २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) पासून झाला. राजस्थान रॉयल्स संघात त्याचा सहभाग होता. आपल्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामातच त्याने प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर २०२६ च्या हंगामात तर त्याने जबरदस्त प्रदर्शन करत 'प्लेअर ऑफ द सीरीज' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' हे पुरस्कार पटकावण्यासोबतच 'ऑरेंज कॅप'ही मिळवली.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi Controversy: टीम इंडियात हुकूमशाही... वैभव सूर्यवंशीच्या कोचचे संघ व्यवस्थापनावर 'गंभीर' आरोप

आयपीएलमधील कामगिरीमुळे भारतीय संघात समावेश

आयपीएल २०२६ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) संघात स्थान मिळाले. तो भारतीय संघात असला तरी त्याला अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या आगामी हंगामात तो कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो आणि आपल्या मोहिमेची सुरुवात कशी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.