

Priyansh Arya T20 Record: दिल्ली कडून खेळणाऱ्या प्रियांश आर्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत तमिळनाडूविरूद्ध धडाकेबाज खेळी केली. या खेळीद्वारे प्रियांश आर्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले. दिल्लीच्या मोठ्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही भारतीय पुरूष क्रिकेटपटूला जमला नाही तो विक्रम प्रियांशने आपल्या नावावर केला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात प्रियांशने दमदार शतक ठोकलं. दिल्लीने प्रियांश आर्याच्या १८१ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद २७५ धावा केल्या. दिल्लीच्या २७५ धावांच्या प्रत्युत्तरात तमिळनाडूला १८.३ षटकात १५९ धावाच करता आल्या. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत प्रियांश आर्या हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने पाच मोठे रेकॉर्ड देखील केले आहेत.
दिल्लीचा कर्णधार प्रियांश आर्याने मंगळवारी SMT स्पर्धेत ६८ चेंडूत १८१ धावांची खेळी केली. पुरूष टी २० क्रिकेटमध्ये एखाद्या भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. दक्षिण अफ्रिकेचा लुआंड्रे गिल्बर्ट प्रिटोरियसने १८८ धावा ठोकत पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर प्रियांश आर्याच्या १८१ धावांच्या खेळीचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ आता ख्रिस गेलची नाबाद १७५ धावांच्या खेळी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
किरण नवगिरेने २०२१ मध्ये केलेल्या महिला वरिष्ठ टी २० ट्रॉफीत ७६ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. ती भारताकडून पुरूष - महिला टी २० क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च खेळी होती. आता प्रियांश आर्याने हा विक्रम मोडला आहे. तर पुरूष टी २० क्रिकेटमध्ये केएल राहुलच्या विक्रमाला देखील मागे टाकले आहे. राहुलने याच वर्षी एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ६७ चेंडूत १५२ धावा ठोकल्या होत्या.
फिन एलनच्या विक्रमाशी बरोबरीट आर्याने २५० पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या असून त्याने त्याच्या १८१ धावांच्या खेळीदरम्यन १९ षटकार मारले. त्याने पुरूष टी २० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या फिन एलनने देखील एका डावात १९ षटकार ठोकले होते. आता टी २० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत फिन सोबत प्रियांश संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे.
इंदौरच्या डेली कॉलेज ग्राऊंडमध्ये प्रथम फलंदाजी करताना आर्याने फक्त १८ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकलं. त्यानंतर दिल्लीने पॉवर प्लेमध्ये १ बाद ९४ धावा केल्या होत्या. त्यानंतर फक्त ३६ चेंडूत शतकी खेळी करत प्रियांशने आपला तिसरा टी २० शतकी धमाका केला. त्याने १५० धावांचा टप्पा गाठण्यासाठी पुढचे २४ चेंडू घेतले. टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो ११ वा फलंदाज ठरला आङे.
प्रियांश आर्याने कर्णधार म्हणून एरॉन फिंचचा टी २० क्रिकेटमधील कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम मोडला. प्रियांशने १८१ धावांची खेळी केली तर एरॉन फिंचने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात १७२ धावा केल्या होत्या.