Vaibhav Sooryavanshi : 'बेबी बॉक्स'चा आणखी एक धमाका! वैभव सूर्यवंशीने केवळ २८ चेंडूत झळकावले शतक, जागतिक विक्रम तुडवला पायदळी

'रायझिंग स्टार्स आशिया कप'मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अत्यंत आक्रमक फलंदाजी
Vaibhav Sooryavanshi Debut
Vaibhav Sooryavanshi DebutPudhari
Published on: 
Updated on: 

Vaibhav Sooryavanshi 16 ball fifty UAE : टीम इंडिया युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात अत्यंत आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आजच्या सामन्यात त्याने केवळ १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आपल्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या तीन षटकांच्या आत ८ षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. यानंतर पुढील १२ चेंडूत त्‍याने शतकही पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने जागतिक विक्रम मोडित काढला असून, लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

दोहामध्ये सूर्यवंशीचा धमाका

'रायझिंग स्टार्स आशिया कप'मध्ये १५ वर्षीय सूर्यवंशीची कामगिरी सुरुवातीला फारशी चांगली नव्हती; नेपाळ आणि पाकिस्तान 'अ' विरुद्धच्या सामन्यांत तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. मात्र, संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात त्याने पूर्णपणे वेगळ्या लयीत फलंदाजी केली आणि दोहाच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला.

पहिल्याच षटकात षटकारांची हॅट्ट्रिक

डावखुऱ्या सूर्यवंशीने पहिल्याच षटकात सलग तीन षटकार (हॅट्ट्रिक) ठोकले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या षटकात त्याने एक चौकार आणि आणखी दोन षटकार मारले. तिसऱ्या षटकात त्याने पुन्हा तीन षटकार लगावत अवघ्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, या युवा खेळाडूने एकूण ८ षटकार मारत संयुक्त अरब अमिरातीच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही.

केवळ २८ चेंडूत शतक झळकावले

आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आपल्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि अवघ्या तीन षटकांच्या आत ८ षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. यानंतर पुढील १२ चेंडूत त्‍याने शतकही पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी हा लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.