Vaibhav Sooryavanshi Brand Value: IPL च्या हंगामानंतर वैभव सूर्यवंशीचा 'भाव' वधारला.. फी झाली दुप्पट

Vaibhav Sooryavanshi Brand Value
Vaibhav Sooryavanshi Brand Valuepudhari
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Brand Value: आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळं वैभव सूर्यवंशी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्याने धावांचा रतीब तर घातलाच. त्याचबरोबर त्याने प्राईज मनी जिंकण्याचा देखील सपाटा लावला. आयपीएलमधून त्याने बक्कळ कमाई केली आहे. आता हा १५ वर्षाचा वैभव जाहिरातींच्या आणि एंडोर्समेंटच्या दुनियेत पाऊल टाकतो आहे. त्याला आता नव्या नव्या डील्सची ऑफर मिळत आहे.

त्यातच आता वैभव सूर्यवंशीने आपला भाव देखील वाढवला आहे. यापूर्वी वैभव सूर्यवंशी एका एंडोर्समेंटसाठी जवळपास १ कोटी रूपये चार्ज करत होता. मात्र आता त्याच्या फीमध्ये जवळपाच दीड ते दोन पट वाढ झाली आहे.

Vaibhav Sooryavanshi Brand Value
Vaibhav Sooryavanshi Viral Post | "हे तुझ्यासाठी आई..." : वैभव सूर्यवंशीची 'मदर्स डे' निमित्त भावूक पोस्ट व्हायरल

फी दुप्पट वाढली

आयपीएलच्या १९ व्या हंगामात वैभव सूर्यवंशीने पाच मोठे पुरस्कार मिळवले. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवने क्रिकेटच्या दुनियेत मोठं नाव कमावलं आहे. अशातच आता अनेक कंपन्या एंडोर्समेंटसाठी त्याच्या मागे मागे धावत आहेत. वैभवने देखील याचा फायदा उचलत आपली एंडोर्समेंटची फी १ कोटी वरून दीड ते दोन कोटी रूपये केली आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

Vaibhav Sooryavanshi Brand Value
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 Earnings | १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस; IPL 2026 मधून किती कमाई केली?

मेगा लिलावात उतरला तर...

डावखुऱ्या वैभव सूर्यवंशीची आयपीएल सॅलरी ही फक्त १.१० कोटी रूपये आहे. मात्र यंदाच्या हंगामात त्यानं केलेली कामगिरी पाहता पुढच्या हंगामात त्याला लिलावात ३० कोटी रूपये बोली देखील लागू शकते. असं असलं तरी सध्या अजून एक वर्ष तरी वैभव हा राजस्थान रॉयल्सकडून खेळेल. ज्यावेळी २०२८ मध्ये मेगा ऑक्शन होईल त्यावेळी वैभव राजस्थान रॉयल्सकडे मोठी मागणी करू शकतो. नाहीतर तो मेगा लिलावात उतरून मोठी बोली पदरात पाडून घेऊ शकतो. मात्र तत्पूर्वी वैभव सूर्यवंशीने आपल्या एंडोर्समेंटचे भाव वाढवले आहेत.

Vaibhav Sooryavanshi Brand Value
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 | वैभव सूर्यवंशीला खेळवणे 'बालकामगार' नियमांचे उल्लंघन...नेमका आक्षेप काय?

दोन डील केल्या होत्या साईन

आयपीएल २०२६ मध्ये त्याने २३७ च्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा ठोकल्या आहेत. दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत एंडॉर्समेंट जगतातील एका जाणकाराने सांगितलं की, आयपीएलच्या पूर्वी काही ब्रँड्ससोबत त्याने १ कोटी रूपयांच्या रेंजमध्ये डील केले होते. मात्र आता तो एंडोर्समेंटसाठी १.५ ते २ कोटी रूपये चार्ज करत आहे. वैभवने कॉम्प्लान आणि रेड बुलसोबत १ कोटीची डील साईन केली होती. मात्र आता तो १.५ ते २ कोटी रूपये चार्ज करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news