Vaibhav Sooryavanshi Viral Post | "हे तुझ्यासाठी आई..." : वैभव सूर्यवंशीची 'मदर्स डे' निमित्त भावूक पोस्ट व्हायरल

Vaibhav Sooryavanshi Mother's Day post | 'पिंक प्रॉमिस' उपक्रमाचा भाग म्हणून वैभवने केली पोस्ट शेअर
Vaibhav Sooryavanshi in Rajasthan Royals Pink Promise Jersey for Mother's Day
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 'मदर्स डे' (मातृदिन) निमित्त आपल्या आईसाठी केलेली एक खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.Pudhari
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Mother's Day Viral Post

मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 'मदर्स डे' (मातृदिन) निमित्त आपल्या आईसाठी केलेली एक खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी वैभवने इन्स्टाग्रामवर आपल्या आईला मानवंदना दिली.

"हे तुझ्यासाठी आई...";

राजस्थान रॉयल्सच्या 'पिंक प्रॉमिस' (Pink Promise) या उपक्रमाचा भाग म्हणून वैभवने ही पोस्ट शेअर केली आहे. ग्रामीण राजस्थानमधील महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाला पाठिंबा देण्यासाठी राजस्थान रॉयल्सने या सामन्यात खास 'ऑल-पिंक' (पूर्णतः गुलाबी) जर्सी परिधान केली होती. वैभवने आपल्या पोस्टला "This one's for you, Maa" (हे तुझ्यासाठी आई) असे कॅप्शन दिले आहे.

Vaibhav Sooryavanshi in Rajasthan Royals Pink Promise Jersey for Mother's Day
Vaibhav Suryavanshi IPL 2026 | "त्याला थांबवणे अशक्य!" : वैभव सूर्यवंशीबाबत गावस्करांनी सर्व IPL संघांना कोणता इशारा दिला?

पिंक प्रॉमिस ही आता एक मोठी चळवळ : आलोक चित्रे

या उपक्रमाबद्दल बोलताना राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) आलोक चित्रे म्हणाले, "पिंक प्रॉमिस ही आता एक मोठी चळवळ बनली आहे. २०२४ मध्ये या उपक्रमाद्वारे २६० घरांना, तर २०२५ मध्ये ५२० हून अधिक घरांना सौर ऊर्जेची मदत मिळाली. यंदाही महिलांच्या नेतृत्वाखालील सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

आयपीएल २०२६ मध्ये वैभवचा धमाका

वैभव सूर्यवंशीसाठी यंदाचा आयपीएल हंगाम अत्यंत लक्षवेधी ठरला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत. यामध्‍ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

Vaibhav Sooryavanshi in Rajasthan Royals Pink Promise Jersey for Mother's Day
Vaibhav Suryavanshi India Debut | वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री कधी? BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टच सांगितलं!

मैदानात मोहम्मद सिराजशी दोन हात

गुजरात टायटन्सने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभवने राजस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या १६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्‍या. मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने लॉंग-ऑनला एक उत्तुंग षटकार ठोकला. मात्र, त्यानंतर सिराजने त्याला बाद करून या रोमांचक लढतीचा शेवट केला.

Vaibhav Sooryavanshi in Rajasthan Royals Pink Promise Jersey for Mother's Day
Rajasthan Royals franchise sale : मित्तल-पूनावाला यांच्याकडून राजस्थान रॉयल्सची खरेदी; १५६६० कोटींचा ऐतिहासिक व्यवहार

अभिषेक शर्मालाही टाकले पिछाडीवर

भारतातील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सातत्याने विक्रमांना गवसणी घालत आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या १५ वर्षीय फलंदाजाने शनिवारी (दि. ९ मे) अनोख्या जागतिक विक्रमाची नोंद केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. याच षटकारासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० षटकार पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. वैभवने हा टप्पा अवघ्या ५१४ चेंडूत गाठला, जो आतापर्यंत कोणत्याही फलंदाजासाठीचा सर्वात वेगवान आकडा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news