T20 World Cup 2026: भारतालाही जमलं नाही, ते श्रीलंकेनं करुन दाखवलं; क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम

T20 World Cup 2026 मध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 182 धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला. हा T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा रन-चेज ठरला असून श्रीलंका या यादीत नंबर 1 बनली आहे.
T20 World Cup 2026 Sri Lanka
T20 World Cup 2026 Sri Lanka Pudhari
Published on
Updated on

T20 World Cup 2026 Sri Lanka Team Create History: T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकत श्रीलंकेने थेट सुपर-8 मध्ये धडाकेबाज प्रवेश केला आहे. पण 16 फेब्रुवारीला पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात त्यांनी जे करून दाखवलं, ते आतापर्यंत कोणालाही जमलं नव्हतं.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला श्रीलंकेने तब्बल 8 विकेट्सनी पराभूत करत इतिहास रचला. या सामन्यात श्रीलंकेने 182 धावांचं लक्ष्य सहज पार केलं. याच कामगिरीमुळे श्रीलंका T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा यशस्वी रन-चेज करणारा संघ ठरला आहे.

T20 World Cup 2026 Sri Lanka
Ishan Kishan 2.0 : नव्या ‌‘किशन अवतारा‌’चे गुपित

या विजयासोबतच श्रीलंकेने भारतालाही मागे टाकलं आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजकडे होता (2014 मध्ये 179 धावा), तर भारत 2016 मध्ये 161 धावांचा पाठलाग करत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आता मात्र 182 धावा पार करत श्रीलंका थेट नंबर 1 वर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी रन-चेज

  • 182 धावा – श्रीलंका (2026)

  • 179 धावा – वेस्ट इंडीज (2014)

  • 170 धावा – वेस्ट इंडीज (2009)

  • 165 धावा – पाकिस्तान (2007)

  • 161 धावा – भारत (2016)

सामन्याचा थोडक्यात आढावा

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 10 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी खेळी करत दमदार सुरुवात करून दिली होती. पहिल्या 10 ओव्हर्समध्येच ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 100 पार गेला होता. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत कांगारुच्या संघाला 181 वर रोखलं.

उत्तरादाखल श्रीलंकेच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाने खेळ करत अवघ्या 18 ओव्हर्समध्येच दोन विकेट्स गमावत 184 धावा करत सामना संपवला. या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला पथुम निसांका, त्याने 52 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांसह झंझावाती खेळी केली.

T20 World Cup 2026 Sri Lanka
T20 World Cup 2026: भारत–पाकिस्तान पुन्हा भिडणार? T20 वर्ल्ड कप मधील सेमीफायनल समीकरण कसं असणार?

हा विजय महत्त्वाचा का आहे?

हा केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा रन-चेज नाही, तर T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलागही आहे. विशेष म्हणजे बांगलादेश किंवा झिम्बाब्वे व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 180+ लक्ष्य पार करण्याची ही श्रीलंकेची पहिलीच वेळ आहे.

शिवाय श्रीलंकेत झालेल्या T20 सामन्यांमध्येही हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी रन-चेज ठरला आहे. एकंदरीत, या विजयामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये ते आता खऱ्या अर्थाने ट्रॉफीचे दावेदार मानले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news