IPL Record: 24 पैकी 20 चेंडू डॉट! RCBच्या खेळाडूची जादुई गोलंदाजी; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Suyash Sharma IPL Record: सुयश शर्माने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 7 धावांत 1 विकेट घेत आयपीएलमध्ये ऐतिहासिक गोलंदाजी केली.
Suyash Sharma IPL Record
Suyash Sharma IPL RecordPudhari
Published on
Updated on

Suyash Sharma IPL Record: IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली विरुद्ध दमदार विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडलं. या सामन्यात वेगवान गोलंदाजांसोबतच युवा फिरकीपटू सुयश शर्माने अशी जादुई गोलंदाजी केली की त्याच्या नावावर आता आयपीएल इतिहासात नवा विक्रम नोंदला गेला आहे.

दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी मिळून तब्बल 7 विकेट घेत दिल्लीचा डाव फक्त 75 धावांत संपवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती 22 वर्षीय फिरकीपटू सुयश शर्माच्या घातक स्पेलची.

Suyash Sharma IPL Record
MS Dhoni: धोनी मैदानात कधी परतणार? अश्विनचा मोठा खुलासा; म्हणाला, "CSK स्पर्धेतून बाहेर पडल्यावरच..."

सुयश शर्माने आपल्या 4 षटकांत अवघ्या 7 धावा दिल्या. विशेष म्हणजे त्यातील 3 धावा वाइडमधून आल्या होत्या. त्याने एक मेडन ओव्हर टाकत 1 विकेटही घेतली. त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 1.75 इतका राहिला, जो आयपीएलसारख्या स्पर्धेत अत्यंत दुर्मिळ मानला जातो.

या सोबत सुयशने आपल्या 24 चेंडूंपैकी तब्बल 20 चेंडू डॉट टाकले. आयपीएल इतिहासात एखाद्या फिरकीपटूने एका सामन्यात टाकलेल्या सर्वाधिक डॉट बॉल्सचा हा नवा विक्रम आहे. याआधी हा विक्रम फक्त दीपक चहरच्या नावावर होता. त्याने 2019 मध्ये 20 डॉट बॉल्स टाकले होते. आता सुयश शर्मा आणि दीपक चाहर हे दोघेही हा विक्रम संयुक्तपणे शेअर करत आहेत.

Suyash Sharma IPL Record
Pune Railway Station Redevelopment: पुणे स्टेशन पुनर्विकासासाठी एसटी बसस्थानकाची जागा रेल्वेच्या ताब्यात?

सुयश शर्माचा आयपीएल प्रवासही तितकाच रंजक आहे. त्याने 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स कडून आयपीएल पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने आरसीबीविरुद्ध 3 विकेट घेत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 2025 पासून तो आरसीबीकडून खेळत आहे आणि सातत्याने प्रभावी कामगिरी करत आहे.

या मोसमात त्याची गोलंदाजी आरसीबीसाठी मोठं शस्त्र ठरत असून, कमी धावा देत विकेट घेण्याची त्याची क्षमता संघासाठी फायदेशीर ठरत आहे. दिल्लीविरुद्धच्या या ऐतिहासिक स्पेलनंतर सुयश शर्मा आता आयपीएलमधील उदयोन्मुख स्टार म्हणून चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news