Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026: कडवी झुंज, वाद अन् अश्रू; तरी सुचिकाने इतिहास रचला! जिंकून दिलं MMA मधील पहिलं पदक

एमएमएचा एशियन्स गेम्समध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. भारताचे हे एमएमएमधील पहिलंच पदक आहे.
Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026
Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026pudhari
Published on
Updated on

Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026: सुचिका तारियालने एशयन्स गेम्स २०२६ मध्ये इतिहास रचला. मिक्स्ड मार्शल आर्ट्स अर्थात (MMA) मध्ये भारताला आपलं पहिलं वहिलं पदक जिंकून दिलं. सोमवारी झालेल्या लढतीत तिने कांस्य पदक पटववलं. ३६ वर्षाच्या सुचिकाचा ६० किलो वजनी गटाच्या सेमी फायनलमध्ये सिंगापूरच्या तेईओ हुई हून कडून पराभव झाला.

Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026
Asian Games 2026 : ‘इलावेनिल’चा डबल ‘सिल्वर’ धमाका! भारताच्या स्टार नेमबाज खेळाडूचा जपानमध्ये डंका

मात्र या सामन्यात सुचिकाने चांगली लढत दिली. तिने सामना अतिरिक्त वेळेत नेला. मात्र पंचांनी निर्णय हूनच्या बाजूने दिला. ज्यावेळी विजेता घोषित केला जात होता त्यावेळी काही नाट्यपूर्ण घडामोडी देखील घडल्या सुचिका ही पंचांच्या निर्णयावर नाराज दिसली. विशेष म्हणजे एशियन्स गेममध्ये पहिल्यांदाच MMA चा समावेश करण्यात आला आहे.

Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026
Asian Games 2026 India vs Bangladesh : बांगलादेशचा धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाची दिमाखात अंतिम फेरीत धडक

अन् डोळ्या अश्रू...

सामन्यानंतर ज्यावेळी पंचांनी दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना स्टेडवर बोलवलं. त्यावेळी सुचिकाने जाण्यास नकार दिला होता. मात्र प्रशिक्षकांनी जाण्यास सांगितलं. त्यानंतर पंचांनी निर्णय दिला अन् सुचिकाच्या डोळ्यातून अश्रू आले.

Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026
Cricket in Asian Games 2026 : ‘एशियन गेम्स’मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा तडका! टीम इंडियाची 2 सुवर्णपदके पक्की

एमएमए कधी सुरू केलं?

सुचिकाने २०१७ मध्ये एमएमए मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने सात वर्षे यातून ब्रेक घेतला होता. ती ज्युडो खेळायला लागली होती. २०२४ मध्ये तिने ब्रेव्ह कॉम्बॅट फेडरशेनशी करार केला. त्यानंतर सुचिका व्यावसायिक एमएमए स्पर्धेत परत आली. तिने ब्रेव्ह सीएफ ९२ मध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा बहरीनमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये पार पडली होती.

Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026
Asian Games : भारत-जपान भिडणार! जेतेपद कायम राखण्‍याच्‍या मोहिमेचा श्रीगणेशा

कोण आहे सुचिका

सुचिका ही ज्युडोकामधील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. तिने बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकाची लढत लढली होती. ती हरियाणामधील रोहतकची असून तिने वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रीडा क्षेत्र गाजवण्यास सुरूवात केली.

स्व रक्षणासाठी तिने ज्युडो शिकले. मात्र पुढे या खेळाची तिला आवड निर्माण जाली. तिने ज्युडोका आंतरराष्ट्रीय स्तारपर्यंत मजल मारली. देशाकडून तिने २० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news